मुल्लाच्या धावपटुला आमदार कोरोटे यांच्याकडून आर्थिक मदत
गुजरातच्या जामनगर येथे ४थ्या राष्ट्रीय युवा खेळ स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता आर्थिक रुपात सहकार्य
देवरी, ता.20: देवरी तालुक्यातील मुल्ला येथील कार्तिक कुवरलाल हेमने याला गुजरातच्या जामनगर येथे २३,२४,१५ जुलै २०२१ रोजी आयोजित ४ थ्या राष्ट्रीय युवा खेळ २०२१-२२ स्पर्धेत सहभाग घेण्या करिता कार्तिक हेमने यास आमदार सहषराम कोरोटे यांनी आपल्या कडून आर्थिक रुपात मदत करुण सोमवारी(ता.१९ जुलै) रोजी सहकार्य केले आणि पुढील यशस्वी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
यात सविस्तर असे की, मुल्ला येथील कार्तिक कुवरलाल हेमने हा धावन्याचा चाचणीत मेरिट लिस्ट टॉप-१० मध्ये आल्याने याची निवड गुजरातच्या जामनगर येथे येत्या २३,२४ व २५ जुलै २०२१ रोजी आयोजित ४ थ्या राष्ट्रीय युवा खेळ स्पर्धा २०२१-२२ मध्ये १५ मीटर (धावन्याचा) दौड़ स्पर्धे करिता करण्यात आली. परंतु कार्तिक ची घरची परिस्थिति हलाखीची असल्याने त्यांच्या समोर आर्थिक अड़चन निर्माण झाली होती आणि वरुण वडील अपंग असल्याने त्याचे या स्पर्धेत सहभाग घेणे कठिन होते. या बाबद ची माहिती जेव्हा आमदार कोरोटे यांना मिळताच त्यांनी एक चांगला धावपटु हा या स्पर्धेत सहभाग घेण्यापासुन वंचित राहु नये म्हणून या गोष्टीची दखल घेत आमदार कोरोटे यांनी कार्तिक हेमने यास आपल्या कडून आर्थिक रुपात मदत करुण सहकार्य केले आणि पुढील यशस्वी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.