ढासगड येथील अनोळखी महिलेचा खून करणाऱ्या 3 आरोपींना बुटीबोरी नागपूर येथून अटक

देवरी 19: दिनांक 23/6 /2021 रोजी सकाळी 10:50 वाजता पोलीस स्टेशन चिचगड येथे माहिती प्राप्त झाली की एका अनोळखी महिलेच्या प्रेत नजीकच्या ढासगड पिपरीखारी जाणारा रोड च्या किनारी जंगलात पडलेले आहे या प्राप्त माहितीवरून पोलीस स्टेशन चिचगड येथील प्रभारी अधिकारी पोलीस स्टॉप सदर बातमीचे शहानिशा करणे कामी घटनास्थळी गेले असता ढासगड मंदिराकडे जाणाऱ्या डांबर रोड पासून अंदाजे 25 फुटावर रस्त्याचे बाजूला एका अनोळखी महिलेच्या वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्षाचे प्रेम रोडवर ओढत नेऊन बाजूला जंगलात टाकलेले व धारदार शस्त्राने गळ्यावर डोक्यावर वार करून जिवानिशी ठार केल्याचे दिसून आल्याने फिर्यादी गणेश राम सीताराम मारगाये वय 67 वर्ष राहणार मोहांडी पोलीस स्टेशन चिचगड तालुका देवरी जिल्हा गोंदिया यांच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 70 2021 कलम 302 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता माननीय श्री विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी दिलेल्या आदेशान्वये नमुद गुन्ह्याचा तपास जालंदर नागकुल उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला.

सदर अनोळखी मृत प्रेताची ओळख पटविण्यास कामी मृतकाचे फोटो सोशल मीडिया तसेच शोध पत्रिका तयार करून सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्यात आली तसेच ओळख पटविण्याचा वर्तमानपत्रात माहिती प्रसारित करण्यात आली परंतु त्यामध्ये काहीही यश न आल्याने सदर मृतकांची ओळख पटविण्यात आली नाही. त्यामुळे पोलिस स्टेशन मधील चार पथक तयार करून लगतच्या पोलिस स्टेशन मध्ये , लगतच्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये , लगतच्या छत्तीसगड मध्यप्रदेश राज्यातील लगतच्या पोलीस स्टेशन मधील महिला बाबत शोध घेण्यात आला परंतु पोलीस पथकास काही उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही.

दिनांक 18/7/ 2021 रोजी सदर गुन्ह्यातील मृतक अनोळखी स्त्री व अज्ञात आरोपीच्या विश्वसनीय बातमीदार कडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रिक साह्याने मदतीने ग्राम भंडारा, जिल्हा भंडारा , बुटीबोरी , दुधा, सायकी जिल्हा नागपूर या गावात जाऊन शोध घेतला असता मिळालेल्या माहितीवरून 1) समीर असलम शेख वय 26 वर्षे राहणार बावला नगर बुटीबोरी जिल्हा नागपूर 2) आसिफ शेरखान पठाण वय 35 वर्षे राहणार बाबा मस्तान वार्ड भंडारा 3) प्रफुल पांडुरंग शिवणकर 25 वर्ष राहणार दुधा , मांगली जिल्हा नागपूर यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील प्रमुख संशयित इसम समीर शेख यास विचारपूस केली असता त्याने सांगितले की गुन्ह्यातील अनोळखी मृत स्त्रीच्या सोबत मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते व तिला पत्नी म्हणून स्वीकारून माहे जुलै 2020 पासून भाड्याने खोलीत बुटीबोरी येथे एकत्र राहत होते.

परंतु माहे फरवरी 2021 मध्ये आरोपी क्रमांक 1 यांचे आई-वडील आणि दुसर्या मुलीशी लग्न जोडून साक्षगंध कार्यक्रम केला होता त्या दरम्यान आरोपीचे घरी सदर मृतक मुलीशी प्रेमसंबंध असून ती अपंग आहे असे माहीत झाल्याने तसेच मृतक तिलासुद्धा आरोपीचे लग्न जुळल्याचे माहीत झाल्याने मृतक महिलेची आरोपी सोबत लग्न करण्याचा हट्ट करीत होती म्हणून आरोपीने तिचा खून करण्याचे ठरवून नातेवाईक आसिफ पठाण राहणार भंडारा व त्याचे मित्र प्रफुल्ल शिवणकर राहणार दुधा या संपर्क करून मृत महिलेला चिचगड परिसरातील जंगलात मोटरसायकल घेऊन जाऊन मृतकाचा तिन्ही आरोपींना मिळून खून करण्याचे ठरवून ढासगड जंगल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मृतक चा लोखंडी धारदार शस्त्राने दिनांक 26/6/2021 रोजी संध्याकाळी खून केल्याचे कबूल केले.

सदर तिन्ही आरोपी यांना आज दिनांक 19/07/2021रोजी अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. माननीय न्यायालयाने दिनांक 23/07/ 2021 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी करीत आहे.

सदर कामगिरी माननीय श्री विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया , श्री अशोक बनकर अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात श्री जालंदर नालकुल उपविभागीय पोलिस अधिकारी आमगाव अतिरिक्त कार्यभार विभाग देवरी , पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक वैशाली पाटील सायबर सेल गोंदिया , श्री अतुल तवाडे ठाणेदार पोलीस स्टेशन चिचगड ,पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे सोबत पोलीस उपनिरीक्षक पाटील , पोलीस उपनिरीक्षक वानखेडे , सहायक फौजदार गोपाल कापगते , चंद्रकांत करपे , पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा , पोलीस नाईक दीक्षित कुमार दमाहे, धनांजय शेंडे, प्रभाकर पलांदुरकर , संजय मारवादे, विनोद बरय्या , मोहन शेंडे , पोलीस नाईक महेश मेहर, चिंतामण कोडापे , तुळशीदास लुटे , रियाज शेख , इंद्रजीत बिसेन , पोलीस शिपाई अजय रहांगडाले , संतोष केदार, विजय मानकर , चालक पोलीस शिपाई पंकज खरवडे यांनी केली आहे.

Share