Duplicate डीएपी खतापासून शेतकऱ्यांनी सावध राहावे
गोंदिया 8 : गोंदिया जिल्ह्यात बनावट डीएपी खत विक्रीस ठेवले जात असल्याची बाब कृषि विभागाच्या
निदर्शनास आलेली आहे. सदर खताच्या पॅकींगवर छापलेल्या मजकुरातून ते डीएपी असल्याचे भासवले जाते. परंतू ते
कमी प्रतीचे व बनावट खत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा खताची विक्री सामान्य डीएपीच्या किंमतीपेक्षा अत्यंत
कमी किंमतीत केली जाते व यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. खत नियंत्रण आदेश 1985 नुसार अशी विक्री
करणे हे नियमबाह्य आहे. याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, डीएपी खताची खरेदी करतांना बनावट
नसल्याची खातरजमा करावी आणि असे गैरप्रकार कुठेही आढळून येत असतील तर अशाप्रकारची माहिती
8856078596 या व्हाट्सॲप नंबरवर देण्यात यावी. असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे यांनी
कळविले आहे.