आमदार कोरोटे यांच्या पुढाकाराने सरकारटोला वासियांच्या पाण्याचा प्रश्न मिटला
आपल्या स्थानीक विकास निधीतून दिला बोरवेल
आमगाव 08:मागील अनेक वर्षापासून आमगावं तालुक्यातील ग्रामपंचायत सरकारटोला येथील वार्ड क्रमांक ०२ येथे नागरिकांनी सतत पाणी टंचाईची समस्या होती. ही समस्या आमदार सहषराम कोरोटे यांना लोकांनी सांगितले असता त्याची दखल घेता आमदार कोरोटे यांनी आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत वार्ड क्र.०२ येथे एक बोरवेल मंजूर करून दिली. या बोरवेल चे गुरूवार (ता.01जुलै ) रोजी विधीवत भूमिपूजन आमदार कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.आणि त्यांच्याच पुढाकाराने विंधन विहिरीला आज भरपूर पाणी लागून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. या भूमिपूजन प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य रत्नकला रहांगडाले, वरीष्ठ कांग्रेस कार्यकर्ता श्रावणजी मेश्राम,सुनीलभाऊ असाटी,आमगाव तालुका कांग्रेस पक्ष संगटक तारेंद्र रामटेके,व बहुसंख्य ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.