“केंद्रातील मंत्रीच नाही तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”

नागपूर 8: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल बुधवारी सायंकाळी पार पडला. यामधील अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर जुन्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत पंतप्रधान बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचं जगणं मुश्कील झालं आहे. सरकारचं अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, असं नाना पटोले म्हणाले. नागपुरमध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सायकल यात्रा काढण्यात आली.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे जुलमी, अत्याचारी सरकारमुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शेजारच्या देशात भारत 30 रुपयांनी पेट्रोल आणि 22 रुपयांनी डिझेल देतं आणि आपल्याच लोकांना 100 रुपयांना का?, असा सवालही नाना पटोलेंनी केला.

दरम्यान, इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसने सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला.

Print Friendly, PDF & Email
Share