वीज पडून महाराष्ट्राचे राज्य पक्षी हरियालांचा मृत्यु
डॉ.सुजित टेटे
देवरी 07: देवरी तालुक्यातआज सायंकाळच्या 6:30 च्या सुमाराचे विजांचा मोठा कळकळात झालेला असून मुरदोली जंगल परिसरात वीज पडल्यामुळे महाराष्ट्राचे राज्य पक्षी हरियालांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हरियाल हे महाराष्ट्राचे राज्य पक्षी असून त्यांचे शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera आहे . हे कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा ‘राज्यपक्षी’ चा सन्मान मिळालेला आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे.
याच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालाच्या अंगावर असतात.
हरियाल हा कबुतरासारखाच घुमतो. कधीकधी चिर्र… चिर्र… आवाज करत फिरतो. नर आणि मादी हरियल यांच्यात बाह्यतः फरक दिसत नाही. हा पक्षी आनंद सागर , शेगाव ,जिल्हा बुलढाणा येथे पण आढळतो.हा पक्षी यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्यात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळतो.
मध्यवर्ती भारतापासून ते उत्तरेकडील सर्व राज्यांत याचा वावर आहे. हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाबव आसाम येथील अभयारण्यांतून दिसून येतो. तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका येथेही हरियाल सापडतो.
सदर घटनेमुळे परिसरातील वन्यप्रेमींमध्ये नाराजी बघावयास मिळाली. सदर हरियाल पक्ष्यांचे छायाचित्र वन्यप्रेमी व पक्षी प्रेमी कपूर बिंझलेकर यांनी प्रहार टाईम्स चा दिले.