नक्षल्यांच्या नावावर दर्रेकसा मार्गावर प्रवाशांची लूटपाट

सालेकसा 08: पोलीस स्टेशन अंतर्गत सालेकसा- दरेकसा मार्गावर ३ अज्ञात आरोपीनी रायपुर मध्यप्रदेश निवासी कारनी प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना ३ लोकांनी थाबवीले नक्षलवादी असल्याचे सांगून चाकूचा धाक दाखवून अंगावर असलेले सोन्याचे दागींने, मोबाइल, व नगदी लुटपाट केल्याची घटना ६ जुले रोजी घडली. फिर्यादी व्यंकटराव सदाशिवराव ढोमने वय ७१ वर्ष, रा. खुशालपुर रिंग रोड न.१ जिल्हा रायपुर (एम. पी.) यांच्या तक्रारीवरुन कलम ३९२, ३४ अन्वये पोलीस स्टेशन सालेकसा येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. फियार्दी व्यंकटराव ढोमने, छन्नूलाल रोकडे., मालनबाई कारेमोरे, वाहन चालक नानेश्‍वर निनावे, मारुती वैगनआर क्र.सी.जी. 0४ एच.ए.१६२३ या वाहनाने सालेकसा-र्देकसा मार्गाने साय. ५ वाजताच्या सुमारास रायपुरकडे. जात होते. रस्त्यावर असलेल्या शारदा मंदिरा जवळ ३ अज्ञात आरोपीनी कार थांबवली आपन नक्षलवादी असल्याचे धाक दाखवून सर्वाना कार मधून उतरवले ७00 ते ८00 मीटर दूर नाल्याजवळ नेले आणि लाठी काठी सर्वाची पिटाई केली. एक छोटा चाकू दाखवून जीवाने मारण्याची धमकी देत फिर्यादीकडून ३ सोन्याच्या अंगठया, एक सोन्याची गोफ, ३ मोबाइल, १२00 सौ.रुपये नगदी असा एकुन एक लाख ८७ हजार ७00 रुपयाचा ऐवज लुटल्याची तक्रार आहे. ठाणेदार प्रमोदकुमार बघेले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते, एपीआय जानकर, व कर्मचारी घटनेचा तपास करीत आहेत.

Share