कोणत्याही ग्रा.पं.ने गावातील पथदिव्याचे विज बिल भारू नये- कमल येरणे

गोरेगावं/देवरी, ता.०४: कोविड च्या संसर्ग काळात जे सरपंच व उपसरपंच हे लोकांना निस्वार्थ सेवा देतांनी मृत्यु मुखी पडले. अशा त्यांच्या कुटुंबियांना शासन स्तरावर ५० लाख रूपयाची आर्थिक मदत व दवाखानातील बिल सुध्दा शासनाने भरना करावे. तसेच गौण खनिज करिता प्रत्येक ग्रा.पं.हद्दित गट मंजूर करुण त्या करिता लागणारा गौण खनिज शुल्क एम.आर.ई.जी.एस.ने आगाऊ देण्यात यावे त्याचप्रमाणे २३ जून २०२१ चे शासन परिपत्रकानुसार १५ व्या वित्त आयोगातुन ग्रा.पं.स्तरावरिल गावातील पथदिव्याचे बिल भरण्या संदर्भातील परिपत्रक रद्द करावे आणि जिल्ह्यातील कोणत्याही ग्रा.पं.ने आपल्या गावातील पथदिव्याचे थकित विज बिल भरु नये असे आवाहन गोंदिया जिल्हा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कमल येरने यांनी केले.

कमल येरने हे गोरेगाव येथे जगत महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवार(ता.१ जुलै) रोजी आयोजित जिल्हास्तरिय सरपंच सेवा संघाच्या बैठकीत बोलत होते.
या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कमल येरने हे होते. या बैठकीत सर्वप्रथम गोंदिया जिल्हास्तरिय सरपंच सेवा संघाची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात नवीन जिल्हा कार्यकारणीच्या अध्यक्षपदी मुरदोलीचे सरपंच शशेन्द्र भगत यांची एकमताने निवड करण्यात आली. तर जिल्हा सचिव पदी. मुंडिपार चे सरपंच नितिन टेम्भरे यांची पुन्हा फेर निवड तसेच जिल्हा प्रसिद्धि प्रमुख पदी कटंगीचे सरपंच तजेंद्र हरिनखेड़े, जिल्हा संघटक पदी तांडाचे सरपंच प्रा.मुनीश राहंगडाले, जिल्हा संपर्क प्रमुख पदी तिगांव चे सरपंच नरेंद्र शिवनकर यांची तर जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी सौ.मधु अग्रवाल, मानेगांव चे सरपंच सौ.सुनंदाताई ऊके, गुदमाचे सरपंच सौ.संगीता ताई गनवीर, वडेगाव चे उपसरपंच खेमराज खोटेले, दाभनाचे उपसरपंच डॉ.दीपक रहीले, देवाटोलाचे उपसरपंच जगत नेताम यांची आणि जिल्हा कार्यकरणी सदस्य म्हणून कारजांचे सरपंच महेंद्र शहारे व सिलेझरी चे सरपंच सुखदेव मेंढे यांची एकमताने निवड करन्यात आली.उर्वरित पदे ही जिल्ह्याच्या पहिल्या बैठकीत भरण्यात येतीलल असे नवनियुक्त अध्यक्ष शशेन्द्र भगत यांनी कळविले आहे.

यानंतर बैठकीत जिल्ह्यातील सर्व ग्रा.पं.स्तरावरील गावातील पथदिव्याचे थकित बिल ग्रा.पं.ने भरना करू नये आणि याबाबद चे शासनाने २३जून २०२१ चे परिपत्रक काढून १५ व्या वित्त आयोगातुन थकित विज बिल भरावे असे आदेश देण्यात आले.या परिपत्रकाचा निषेध ही करण्यात आला. तसेच कोविड संसर्ग काळात जे सरपंच व उपसरपंच लोकांना सेवा देतांनी मरण पावले. अशा त्यांच्या कुटुंबियांना शासनस्तरावर ५० लाख रूपयाची आर्थिक मदत करावे व दवाखान्याचे बिल सुध्दा शासनाने भरणा करावी आणि गौण खनिज करिता प्रत्येक ग्रा.पं.हद्दित गट मंजूर करुण त्या करिता लागणारा गौण खनिज शुल्क एम.आर.ई.जी.एस.ने आगाऊ देण्यात यावे. अशा प्रकारे विविध मांगण्यांना घेवून राज्य कार्यकारणीने धरने आंदोलना करिता तारीख व रुपरेशा ठरवावी असे ठराव पारीत करण्यात आले.

या बैठकीत सालेकसा तालुकाध्यक्ष संजू कटरे, आमगांव तालुकाध्यक्ष सुनील ब्राम्हणकर, अर्जुनी मोरगांवचे सरपंच इंजी.हेमकृष्ण कापगते, गोंदियाचे सरपंच प्रा.मुनीश राहांगडाले, तिरोडाचे सरपंच नितेश खोब्रागडे, गोरेगाव चे सरपंच सोमेश्वर राहांगडाले, सड़क अर्जुनीचे सरचिटणीस दिनेश कोरे, जीवन लंजे, जगत नेताम, यांच्या सह बहुसंख्य सरपंच व उपसरपंच आवर्जून उपस्थित होते.

Share