तालुका प्रतिनिधी
सालेकसा : स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही सालेकसा तालुक्यात चाळीस वर्षापासून परिवहन महामंडळाची एसटी ग्रामीण भागात पोहोचली नसल्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे व खाजगी वाहनांनी प्रवास करून पैसेसुद्धा अधिक मोजावे लागत आहे सालेकसा तालुका आदिवासी नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असून बऱ्याच गावात रोड रस्ते तयार झाले मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा याकडे नेहमी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवासाचा कडून केला जात आहे. जवळपास तालुक्यात 35 ते 40 गावात एसटी बस धावत नाही यात बोदलबोडी धानोली दरबडा गिरोला भाडिपार तीरखेडी गांधीटोला सातगाव दूरगुटोला. लोहारा मरकाखंदा शिंधीटोला जोशीटोला म्हसीटोला केहरीटोला नानवा इसनाटोला भजेपार बापूतोला चरजेटोला नदीटोला माताटोला पोवारीटोला पीपरटोला गोंडीटोला सोनारटोला ढिवरटोला सितेपाला गोरे शंकरटोला यांच्यासह इतर गावात एसटी बस धावत नाही विशेष म्हणजे स्थानिक जनलोक प्रतिनिधी व वरिष्ठ कर्मचारी यांनी जर लक्ष दिले तर नक्कीच 35 ते ते 40 गावात महाराष्ट्र राज्य महामंडळाची एसटी बस सुरू होण्यास उशीर होणार नाही सालेकसा ला नेहमी शासकीय कामानिमित्त ये-जा करण्यास फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. निवडणुका आले की नेतेमंडळी मतदारांना मोठे प्रलोभन देऊन तुमच्या मागण्या व सोयी सुविधा करणार असल्याचे सांगून आपली पोडी शेकून. मतदारांच्या पदरात काहीच पडत नाही संबंधित महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व परिवहन मंत्री खासदार आमदार यांनी विशेष लक्ष द्यावे व प्रवाशांसाठी पर्यायी बसची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.