
मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी
नवी दिल्ली : देशव्यापी कोरोना विरोधी लसीकरण अभियानांतर्गत आणखी एका लसीला समाविष्ठ करण्यात आले आहे. अमेरिकन कंपनी मॉर्डनाच्या लसीला भारतात आपत्कालीन वापरात मंजूरी देण्यात आली आहे. मॉर्डना लसीला फायझर पूर्वीच मंजुरी मिळाली आहे. स्पुटनिक प्रमाणे मॉर्डना लसीचा पुरवठा देखील तूर्त विदेशातून केला जाईल. पंरतू, येत्या काळात देशांतर्गतच या लसीचे उत्पादन घेतले जाईल. प्राप्त माहितीनूसार दोन दिवसांपूर्वी मॉर्डना लसीकरिता औषध निर्माती कंपनी सिपला कडून अर्ज सादर करण्यात आला होता. अर्जाच्या माध्यमातून लसीच्या परीक्षणासंबंधी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती.
- गोंदिया जिल्हातील जलसाठ्यात घट, शिरपूर जलाशयात फक्त 18.74 टक्के पाणी
- विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक, शिक्षण विभागात खळबळ
- अवैद्य वाहन पार्किंगवर नियंत्रण कुणाचे ? देवरीत आपले स्वागत आहे वाट्टेल तिथे अवजड वाहन उभे करा ?
- व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
- देवरी चेकपोस्टवर आरटीओ अडकला एसीबी च्या जाळ्यात
जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्ल्यूएचओ यादीत समाविष्ठ असल्याने मॉर्डना वर भारतात चाचणी करण्याची आवश्यकता नाही. अशात पहिल्याच बैठकीत ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी सिपला कंपनीचा अर्ज मंजूर करीत देशात चौथ्या लसीच्या रूपात मॉर्डना ला आपत्कालीन वापरात परवानगी दिली.
पुढील महिन्यात मॉर्डना लसीची पहिली खेप भारतात येईल. यानंतर हिमाचल प्रदेशातील कसोली येथील केंद्रीय प्रयोगशाळेत लसीच्या पहिली बॅचची तपासणी केली जाईल. तदनंतर १०० लोकांच्या लसीकरणाचा अभ्यास केल्यानंतर लस रूग्णालयात उपलब्ध करवून देण्यात येईल. या प्रक्रियेला जवळपास महिन्याभरांचा वेळ लागू शकते. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत लस लसीकरण केंद्रावर उपलब्ध होईल. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या विशेषतज्ञ कार्य समितीच्या (एसईसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार मॉर्डना लसीच्या उत्पादनासंबंधी औषधी निर्मात्या कंपन्यांसोबत चर्चा केली जात आहे. सिपला कंपनी मॉर्डना लसीसंबंधी सर्व बाबींवर लक्ष ठेवेल, असी माहिती वरिष्ठांकडून देण्यात आली आहे.