डेल्टा प्लस कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानी बाळगावी – जिल्हाधिकारी खवले

गोंदिया 29 : कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. आता डेल्टा व डेल्टा प्लस कोविड विषाणूच्या नव्या
प्रकारामुळे प्रादुर्भावाचे संकेत दर्शविण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक सावधानी बाळगून मास्क
वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व हात वारंवार स्वच्छ करणे या त्रिसुत्री कार्यक्रमामुळे तसेच शासनाने वळोवेळी
निर्गमीत केलेल्या कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोरोनावर मात करणे
शक्य आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी डेल्टा व डेल्टा प्लस या नविन विषाणूच्या संभाव्य धोका
असलेल्या पुर्वतयारी निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले.

महाराष्ट्रामध्ये कोविड-19 चा नविन प्रकार डेल्टा व डेल्टा प्लसचे बाधित रुग्ण रत्नागिरी, जळगाव, ठाणे,
पालघर, मुंबई व सिंधूदुर्ग जिल्ह्यात आढळलेले आहे. या नविन विषाणूमध्ये संसर्गाची वाढीव क्षमता आहे. डेल्टा व
डेल्टा प्लस हा नविन विषाणू फुफुसाच्या अवयवास जास्त आकर्षण करते. सदर विषाणूचा Monoclonal antibody
या औषधोपचाराला कमी प्रतिसाद आहे.
डेल्टा व डेल्टा प्लस हा नविन कोविड विषाणू प्रथम मार्च 2021 मध्ये युरोप देशाच्या तिसऱ्या लाटेत
आढळला. सध्या भारत व्यतिरिक्त अमेरिका, लंडन, पोर्तुगाल, स्विझरलँड, जपान, पोलँड, नेपाल, चीन व रशिया या
देशात डेल्टा व डेल्टा प्लस हा नविन कोविड विषाणू आढळला आहे. या कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची
शक्यता आयसीएमआर व इतर राष्ट्रीय पातळीच्या आरोग्य संस्थांनी तिसऱ्या लाटेच्या स्वरुपात येण्याची शक्यता
वर्तविली आहे.


सध्या गोंदिया जिल्ह्याचा समावेश लेवल 1 मध्ये असल्याने वेळेत बदल करुन काही निर्बंध लावण्यात आलेले
आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्वप्रकारची आस्थापने, दुकाने, व्यवसाय यांना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी
4 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता डेल्टा व
डेल्टा प्लस हा नविन कोविड विषाणू गोंदिया जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे
जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या बाजारपेठ यांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. सर्व सामाजिक व राजकीय समारंभास
व लोकांच्या जमावास मर्यादेचे निर्बंध लावण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण
करावे, Antigen व RT-PCR चाचणीची संख्या वाढवावी, नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करावी,
आरोग्य यंत्रणा व आवश्यक साहित्याची पुरेशी व्यवस्था ठेवावी. उपचाराकरीता लागणाऱ्या आवश्यक औषधांचा
मुबलक साठा ठेवावा. असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आरोग्य विभागाला दिले.
बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश
मोहबे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share