राजश्री शाहु महाराज हे खऱ्या अर्थाने आरक्षणाचे जनक -आमदार सहषराम कोरोटे

?देवरी येथे छत्रपति शाहु महाराज यांची जयंती साजरी

देवरी, ता.२७: सन १८८४ ते १९२२च्या ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याकरीता व बहुजन समाजाच्या सामाजीक उन्नतिसाठी या काळामध्ये छत्रपति शाहु महाराजांनी प्रयत्न केले आणि सामाजीक परिवर्तनाला गति प्राप्त करुण दिले. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलीत व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली, राजश्री शाहु महाराज हे खऱ्या अर्थाने आरक्षणाचे जनक होते. असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.ते देवरी येथे आमदार कोरोटे भवनात शनिवार(ता.२६ जून) रोजी छत्रपति शाहु महाराज यांची जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुण उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.

सर्वप्रथम राजश्री शाहु महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करुण अभिवादन करन्यात आले. या प्रसंगी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, प्रशांत कोटांगले, अविनाश टेम्भरे, भुवन नरवरे, कैलाश देशमुख, जैपाल प्रधान, शार्दूल संगिड़वार , मनोज नंदेश्वर, आनंद येरणे, संजय कोरे यांच्या सह देवरी परिसरातील काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर केन्दसरकार द्वारे ओबीसी समाजाच्या आरक्षणा बाबद केलेल्या क्रुत्याबाबद मोदीसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निर्देशन ही करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share