भाजपला धक्का : ५०च्या वर भाजप कार्यकर्त्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

आमदार कोरोटे यांच्या विकास कार्याशी प्रभावीत होऊन पक्षात केला प्रवेश

सालेकसा, ता.२७: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यातील पाऊडदौना येथील ५०च्या वर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार सहषराम कोरोटे यांच्या विकास कार्याशी प्रभावीत होऊन संजय पटले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार(ता.२६ जून) रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आमदार सहषराम कोरोटे व सालेकसा तालुका काँग्रेस चे अध्यक्ष वासुदेव चूटे यांनी काँग्रेस पक्षाचा दुप्पट्टा घालुन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे घनश्याम नागपूरे, शैलेश बहेकार, विनोद बनोठे, नितेश शिवणकर, ओमप्रकाश ठाकरे, व विजय फुंड़े हे प्रामुख्याने उपस्थित होते.

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या मध्ये पाऊडदौना येथील संजय पटले, राधेश्याम पटले, रमेश बंसोड़, रूपचंद मच्छीरके, डुड़ेश्वर पटले, घनश्याम पटले, लोकनाथ पटले, जयचंद मच्छीरके, बाबूलाल रराटिया, सुनील तरोणे, संतोष मेंढे, नारायण लिल्हारे, छोटेलाल मोहूर्ले, लखन मोहूर्ले, उमाशंकर चूटे, राजेन्द्र पटले, बेबी पटले, चित्रसेन लिल्हारे, धनकुंवर लिल्हारे, अमृतलाल लिल्हारे, डिले लिल्हारे, कवडू पटले, गुणेंद्र पटले, हिवराज पटले, गुणेश्वर पटले, विनोद फरकुंडे, वीरेंद्र फुंडे, जयपाल फुंडे, कुवरलाल मच्छीरके, शिवचरण बंसोड़, भिवराम नागपूरे, बळीराम शहारे, जीवनलाल येसनसुटे, कमलचंद वालदे, तिलकराम वालदे, सोनी वालदे, सियाराम लिल्हारे, भाऊलाल उरके, रोशन वाढई, यतराम मच्छीरके, विक्की नागपूरे, सुगनतीन लिल्हारे, यांच्या सह ५०च्या वर कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.

Share