◾️दिव्यांग बांधवांचे 5 टक्के निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरित जमा करा- शिवसेना देवरी तालुका
देवरी 25:
स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या आर्थिक वर्षाचे स्वनिधीतील पाच टक्के निधी दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक असते असे शासनाचे नियम आहे.
देशात कोरोना सारख्या महामारी चे संकट निर्माण झालेले आहे. या काळात दिव्यांगांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक वर्ष 2020 -21 च्या दिव्यांगासाठी असलेला पाच टक्के निधी नगरपंचायत देवरी द्वारा अजून पर्यंत वाटप करण्यात आलेला नाही.
“सर्व प्रक्रिया पूर्ण करून निधी 24 एप्रिल लाच देना बँके कडे पाठवला आहे. परंतु बँक एकत्रिकरणामुळे अजून वितरित झालेला नाही.”- अजय पाटणकर, मुख्याधिकारी देवरी
याकरिता दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला 5 टक्के निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरित जमा करण्यात यावा असे निवेदन शिवसेना देवरी तालुका तर्फे मा.मुख्याधिकारी साहेब नगरपंचायत देवरी यांना देण्यात आले. यावेळी देवरी तालुका प्रमुख सुनीलजी मिश्रा, शहर प्रमुख राजा भाटिया, उपशहर प्रमुख महेश फुंन्ने, महिला आघाडी देवरी तालुका संघटीका सौ. प्रीती उईके, तालुका उप संघटिका इंजि. प्रीती नेताम, तसेच नेवरगडे, सचिन भांडारकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.