‘रिलायन्स’चं आता शिक्षण क्षेत्रात पाऊल..! महाराष्ट्रातून करणार सुरुवात, मुकेश अंबानी यांनी काय घोषणा केलीय पाहा..!

रिलायन्स इंडस्ट्रीजने भारताचं अवघं विश्व व्यापलं आहे. व्यापार, उद्योग, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात ‘रिलायन्स’ने आपले पाय घट्ट रोवले होतेच; पण आता ‘रिलायन्स’ने शिक्षण क्षेत्रातही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आज (ता.24) तशी घोषणा केली.

रिलायन्स इंडस्ट्रीजची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांतून झाली. त्यात मुकेश अंबानी यांनी तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी संवाद साधला.सभेच्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांच्यासह आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. सभेत बोलताना मुकेश अंबानी यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या.

यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून मुंबईत ‘जिओ इन्स्टिट्यूट’ (Jio Inistitute) सुरू करणार असल्याची मोठी घोषणा ‘रिलायन्स’कडून करण्यात आली आहे. त्याच वेळी कोरोना काळातही विकासकामे सुरुच राहणार असल्याचे नीता अंबानी यांनी जाहीर केले.सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रिलायन्स’ वचनबद्ध आहोत. जिओ इन्स्टिट्यूट यावर्षी नवी मुंबईतील त्यांच्या कॅम्पसमध्ये शैक्षणिक सत्र सुरू करणार असल्याचे नीता अंबानी यांनी जाहीर केले.

संशोधन, नावीन्य आणि जागतिक स्तरावरील व्यासपीठ असलेली ‘जिओ इन्स्टिट्यूट’ ही शैक्षणिक संस्था आहे. भारत आणि जगाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणारी उज्ज्वल भावी पिढी इन्स्टिट्यूट तयार करील, असे नीता अंबानी यांनी सांगितले.

Share