अखेर अनोळखी महिलेची ओळख पटली…. जाणून घ्या कुठली आहे मृत महिला ?
प्रहार टाईम्स ने केले होते वृत्त प्रकाशित
देवरी 18: देवरी तालुक्यातील लोहारा पुराडा गावाच्या मधोमध वाहणाऱ्या बाघनदी वरील पुलाखालून एक अनोळखी महिलेचे मृतदेह वाहत असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
ब्रेकिंग : लोहारा येथील बागनदीच्या पुलाखाली आढळले अनोळखी महिलेचे मृतदेह
माहिती प्राप्त होताच देवरी आणि सालेकसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक मासेमारांच्या मदतीने सदर मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले होते आणि अनोळखी मृतदेह असल्यामुळे पोलिसांद्वारे social media च्या मदतीने माहिती मिळविण्याचे प्रयत्न करण्यात aale होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मृतदेहाचे नाव व पत्ता समोर आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव ‘ज्योती उल्हास मारबते’ वय 25 वर्षे असे आहे. ती कुलपा/कारंजा (मध्यप्रदेश ) येथील रहिवासी असून बोरकन्हार येथे माहेरी आली असल्याचे बोलले जाते.
घटनेचे कारण काय ? ती देवरी तालुक्यातील लोहारा परिसरातील बाघनदी मध्ये कशी का तरंगत आली ? याचा तपास सालेकसा पोलीस करीत आहेत.