अरे वा ! देवरीत Fish-बिर्याणी, Fishमोमोज, Fishमंचुरियन , Fishपिझ्झा पदार्थ करण्याचे प्रशिक्षण..

डॉ.सुजित टेटे

देवरी 18: चिकन चिल्ली , बिर्याणी , चिकन लॉलीपॉप हे नाव सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि खवय्यांनी या पदार्थांवर नक्कीच ताव मारला असेलचं !

आदिवासी बहुल आणि मागासलेला भाग म्हणून देवरी तालुक्याची ओळख आहे. आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांचे शेती , मजुरी , पशुपालन आणि मासेमारी प्रामुख्याने व्यवसाय असून त्यांची उपजीविका याच व्यवसायावर भागात असते त्याचे सोने व्हावे या उद्देशाने नुकताच देवरी तालुक्यातील बोरगाव/बाजार येथील किरण प्रभाग संघ कार्यालयात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान पंचायत समिती देवरी अंतर्गत मत्स्य उत्पादकांच्या आर्थिक उत्पादनात वाढ व्हावी या प्रमुख उद्देशाने मासोळ्या पासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण अतुल मुरकुरे तालुका अभियान व्यवस्थापक, ओमप्रकाश पाथोडे ता. अ. व्य. (MTS), गोटाबोडी प्रभाग समन्वयक विराग वाकडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

मुल्यवर्धिक पदार्थात प्रामुख्याने मत्स्य कटलेट, मत्स्य फिगर, मत्स्य चाप, मत्स्य आर्ली (भजे) मत्स्य वडा, मत्स्य फ्रॅकी, मत्स्य मेमोज, मत्स्य मंचूरियन, मत्स्य फियाॅग, मत्स्य कबाब, मत्स्य पिझ्झा, मत्स्य बिर्याणी, मासोळ्या चे लोणचे, मत्स्य चकली, मत्स्य सेव, मत्स्य पापड, इ. पदार्थाची प्रात्यक्षिक प्रशिक्षणात सहभाग होता.

या प्रशिक्षणामध्ये मासोळ्या पासून मुल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण अर्जुनी/मो उमेदचे CFM गोपाल मेश्राम व त्यांचे सहकारी मत्स्य सखी रविता कांबळे, भुमाला मेश्राम, वर्षा गेडाम यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आमगांव येथिल उमेदीचे CFM देविलाल केवट, वलथरे तसेच देवरी येथिल उमेदचे CFM नंदीनी भांडारकर, तालुक्यातील मत्ससखी छबिकला शेंडे, ललेश्वरी मडावी, उर्मिला केवट, गिता राऊत, प्रभा मेश्राम, गिता, वनिता मेश्राम, पुष्पा वरखडे, निरंजना मोहनकर, यांनी सदर प्रशिक्षणाकरिता परीश्रम घेतले.

Share