गोंदिया विमानतळाची खा. सुनील मेंढे यांचे कडून पाहणी

प्रवासी वाहतुकी संदर्भात साधला संवाद

गोंदिया 18: गोंदीया येथील बीर्सी विमानतळावर सुरू होऊ घातलेल्या खाजगी प्रवासी विमान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर आज खासदार सुनील मेंढे यांनी पाहणी करण्याच्या दृष्टीने विमानतळाला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरी उड्डयन महासंचालकांशी चर्चाही केली.
खासगी विमान कंपनीद्वारे येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये गोंदिया येथील बीर्सी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.या वाहतुकीला विमानतळ प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज खासदार सुनील मेंढे यांनी विमानतळाला भेट देत पाहणी केली. याच वेळी सर्वेक्षणासाठी त्या ठिकाणी नागरी उड्डयन महासंचालक दीपा सक्सेना आल्या होत्या. त्यांच्याशीही खासदारांनी विमानतळाच्या सोयी सुविधा आणि अन्य विषयांवर चर्चा केली. विमानतळावरून लवकर वाहतूक व्हावी या दृष्टीने घेऊन प्रयत्न व्हावे अशा सूचना खासदार सुनील मेंढे यांनी केल्या. विमानतळ संचालक विनय ताम्रकार, गजेंद्र फुंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share