चिचगड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम : 170 झाडांना बसविले रिफ्लेक्टर्स

देवरी 17: पोलीस अधीक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर ,यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली, तसेच ‘पोलीस स्टेशन चिचगड’ यांचे सौजन्याने आगामी “रस्ते सुरक्षा सप्ताह” लक्षात घेऊन नक्सलग्रस्त भागातील धोकादायक व अतिधोकादायक रस्ते,वळणे,रस्त्यालगत ची धोकादायक झाडे यांना वेगवेगळ्या प्रकारचे व रंगाचे दिशादर्शक “reflectors” चिचगड ते परसोडी तसेच परसोडी ते गडेगाव/मार्गे काकोडी रोडवर जाताना धोकादायक अश्या 170 झाडांना व धोकादायक वळणावरिल ठिकाणी अपघाताचे वाढते प्रमाण बघता अतिधोकदायक वळणाच्या ठिकाणी सर्व झाडांना बसवण्यात आले जेणेकरून लोकांचे अपघाताचे प्रमाण कमी होऊन त्यांच्या जीविताची सुरक्षा व्हावी व जनतेमध्ये गोंदिया पोलिस विभागाच्या प्रति सहानभूती चे वातावरण निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून केलेल्या उपक्रमाची स्तुती आणि कौतुक करण्यात येत आहे . यामध्ये- “कम्युनिटी पोलिसिंग” पो.शि. संदीप तांदळे/1979, पो.ना.कमलेश शहारे, पो. स्टे. चिचगड यांनी कामगिरी केली.

Share