बेलारगोंदी येथे जखमी चितळाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचविले
?पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राण्यांची गावाकडे भटकंती ?वनतलाव फक्त नावापुरतेच
देवरी 17: डोंगराळ आणि घनदाट जंगलाने वेढलेला तालुका म्हणून देवरी ची ओळख आहे. घनदाट जंगल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी या क्षेत्रात वास्तव्याला असतात.
जंगलामध्ये वन्य प्राणांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वन बंधारे व तलावाच्या माध्यमातून शासनाच्या निधीतून करण्यात आली परंतु सदर वनबंधारे व तलाव वन्यप्राणांची तहान भागवायला अपयशी ठरलेले आहे असे स्पष्ट चित्र आहे त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात.
प्राप्त माहितीनुसार देवरी तालुक्यातील बेलारगोंदी गावात आज पहाटे 6 च्या सुमारास सोमा जमदाळ यांच्या शेत परिसरात एक चितळ जातीचे हरीण पाण्याच्या शोधात आले होते गावात शिरताच कुत्र्यांनी त्यावर हल्ला चढविला त्यामध्ये चितळ जखमी झाला आहे .
प्रसंगावधान साधून सदर गावकऱ्याने त्या चितळाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले आणि वनविभागाला सूचित करण्यात आले.
वनविभागाची टीम उशिरापर्यंत बेलारगोंदी ला पोहचली असून जखमी चितळावर उपचार करणे आवश्यक आहे.