डॉ. फुके यांच्या कडून देवरीला तीन ऑक्सिजन मशीन भेट

प्रहार टाईम्स
देवरी 16
मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना नको त्या समस्यांना तोंड देत मानसीक त्रासाला समोरा जावं लागले. तर, काहींना प्राण गमवावे लागल्यामुळे पुन्हा अशी वाईट परिस्थितीची पाळी नागरीकांवर येऊ नये; यासाठी भविष्याची शिदोरी म्हणून माजी पालकमंत्री डाॅ. परिणय फुके यांनी देवरी तालुक्यासाठी तीन ऑक्सिजन कंसट्रेटर मशीन दिल्या.
सदर तीन ऑक्सिजन कंसट्रेटर मशीन 16 जूनला देवरी येथे आयोजीत भाजपच्या तालुकास्तरीय बैठकीत अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ. फुके म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा सामाजिक समरसता ठेवणारा राष्ट्रीय पक्ष असून राजकारण कमी आणि गोरगरिबांच्या सतत सेवेसाठी समाजकारण जास्त करणारा पक्ष असल्याचे सांगितले.

https://public.app/s/SxcrP

यावेळी राज्य कार्यकारीणीचे सचिव संजय पुराम, जिल्हा उपाध्यक्ष झामसींग येरणे, प्रमोद संगीडवार, जिल्हा संघटक संजय कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अनिल येरणे, वरिष्ठ मार्गदर्शक श्रीकृष्ण हुकरे, सुखचंद राऊत, सत्यनारायण अग्रवाल, महेंद्र मेश्राम, कोंदा भाटीया, यशवंत गुरनुले, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शाहू, तालुका महामंत्री प्रवीण दहीकर, विनोद भांडारकर, लक्ष्मण सोनसर्वे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष छोटू भाटीया, महामंत्री सोनू चोपकर, योगेश ब्राह्मणकर, नितेश वालोदे, संजय दरवडे, दिनेश भेलावे, ललन तिवारी, किशोर येनप्रेडीवार, अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष इमरान खान, महामंत्री माजीद खान, माजी जि. प. सदस्या सविता पुराम, माजी सभापती सुनंदा बहेकार, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, जिल्हा कार्यकारीणी सचिव अनिता चन्ने, प्रज्ञा संगीडवार, अंबिका बंजार, रचना उजवणे आणि विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Share