राणू मंडलला उद्धपटणा पडला महागात, आता अशा प्रकारे जगते जीवन
मुंबई: अनेकवेळा आपण रेल्वे स्टेशनवर काही गरीब लोकांना गाणं म्हणताना पाहतो. यामध्ये काही लोक अगदी गायकांना देखील लाजवेल अशी गाणी म्हणतात. काही दिवसांपुर्वी राणू मंडल यांचा देखील असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर त्या एक प्रसिद्ध गायिका बनल्या होत्या. मात्र त्यांना लोकांच्या मनावर राज्य करता आलं नसून अनेकांशी उद्धटपणे वागणं त्यांना महागात पडलं आहे.
राणू मंडल यांनी स्टेशनवर एक गाणं म्हटलं होतं. यानंतर त्यांचा तो व्हिडीओ इतका व्हायरल झाला की प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया यांनी राणूला त्यांच्यासोबत गाण्याची संधी दिली. एवढंच नाही तर यामुळे राणू या प्रचंड प्रसिद्ध झाल्या. मात्र, आपल्या चाहत्यांसोबत त्या प्रचंड वाईट वागत होत्या.सध्या मंडल या राणाघाट मधील बेगोपारा येथे एकट्या रहात आहेत. मागील काही दिवसांत त्यांनी जे काही कमवले त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू असल्याचे समजते आहे. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं या सर्वामुळे त्यांचे जूने दिवस परत आले आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगशेकर यांचे प्रसिद्ध गाणे ‘एक प्यार का नगमा है’ गाऊन रानू मंडल एका रात्रीत लोकप्रिय झाल्या होती. त्यानंतर काही शोमध्येदेखील गेस्ट म्हणून बोलवण्यात आले होते. तसेच रानू मंडल काही पब्लिक इव्हेंटमध्ये देखील दिसल्या होत्या.