सरकारमधील मुख्यमंत्री पद वाटण्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य….

मुंबई: शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही ही कमिटमेंट आहे, असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही वाटा नाही, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहणार आहे अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील परवा जाहीरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणी आपण संस्कारी आहेत, इथं शत्रुत्व टोकाचं नसतं, राजकारणात मतभेद असतात. चंद्रकांत पाटील यांना मी चांगल्या भावनेने शुभेच्छा दिल्या. वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण 5 वर्षे राहील. इथं वाटाघाटी नसल्याचं राऊतांनी सांगितलं.

दरम्यान, 2024 ला नरेंद्र मोदीच येणार ही भाजप नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाची बाजू मांडतात. विरोधी पक्ष एकत्र आला तर लढाई होईल. भविष्यात काय होणार नाही माहीत नाही. कोणाला राजकारण मुठीत ठेवता येणार नाही. प्रशांत किशोर अनेक जणांना भेटले, त्यांची स्वतंत्र यंत्रणा असल्याचं राऊत म्हणाले.

Print Friendly, PDF & Email
Share