अत्यंत दुर्देवी! सर्पदंश झालेल्या माय- लेकांचा मृत्यू…
सालेकसा : पावसाला सुरु झाला की, सरपटणाऱ्या प्राण्याचा मनुष्य वस्तीत वावर किती धोकादायक असतो, यांची प्रतीची गोंदिया जिल्ह्यात दिसून आली आहे. रात्रीच्या गोड झोपेत असतांना झोपित सापाने दंश केल्याने आई आणि मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील मुंडीपार गावात घडली आहे.
सतवन दिलीप मोहारे (वय 38 वर्षे), दिपक दिलीप मोहारे (वय 11 वर्षे) असे मृतकाचे नावे आहे. सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील मोहरे कुटुंब रात्री आपल्या घरी जेवन आटपुन सुखाने झोपण्याची तयारी करून, झोपी गेले होते. मात्र, त्यांना काळ घरीच आल्याची कल्पना नव्हती. दरम्यान, रात्री घरात जमीनीवर झोपले असतांना रात्री 2 वाजेच्या सुमारास सापाने आई, सतवन दिलीप मोहारे तिच्या उजव्या हाताचे कोहनी जवळ चावा घेतल.
तसेच तिचा मुलगा दिपक दिलीप मोहारे याच्या कानाजवळ सापाने दंश केल आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला असून, घरातले सर्व मंडळी जागे झाले व सापाला ठार मारले. मात्र, सर्पदंर्शाने आई आणि मुलाची प्रकृति बिघडु लागली, त्यामुळे त्यांना उपचाराकरिता गोंदिया पाठवण्यात आले.
दिपक याचा रस्त्यात मृत्यु झाला व आई सतवान हिचा केटीएस रुग्णालया मध्ये उपचार दरम्यान मृत्यु झाल आहे. या सर्व घटनेची माहिती सालेकसा पोलीस ठाण्यात नोंदविला आहे. एकाच दिवशी एकाच कुटुंबामधील दोघांच्या मृत्युने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.