देवरी तालुकाप्रशासनाची आपुलकीची भेट, अनाथांना दिला मदतीचा हात..

डॉ. सुजित टेटे
देवरी 10:
गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड विषाणू मुळे मरण पावलेल्या कुटुंबांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून अनाथांना आपुलकीची भेट देत देवरी तालुकाप्रशासनाने मदतीचा हात दिला.

जागतिक कोरोना महामारीच्या काळात कोरोनामुळे कुणाचे पती-पत्नी,आई -वडील,मुले गमावली त्यांच्याप्रती सहानुभूती बाळगणं हे सहृदयतेचं लक्षण आहे.नेमकी ही सहृदयता गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश खवले आणि तहसीलदार विजय बोरुडे यांनी दाखवत भेट आपुलकी या उपक्रमाअंतर्गत देवरी तालुक्यात कोरोनामुळे जीव गमावलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन अर्थासहाय्यता,अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहेत. नुकतेच देवरी तालुक्यातील मौजा ओवारा येथे अनाथ झालेल्या कुटुंबाला तलाठी पठाण मॅडम आणि महसूल पथक तहसील कार्यालय देवरी यांनी किट वाटप केले , निलज येथील नित्यानंद घरत यांच्या वारसांना के डी बागडे तलाठी मार्फत किट वाटप , मौजा पिंडकेपार/गो. येथे अनाथ झालेल्या कुटुंबाना तलाठी पेंदाम मॅडम आणि महसूल पथक देवरी तहसील कार्यालय यांनी किट वाटप केले .

तालुका प्रशासनाची ही सहृदयता व संवेदना बघून सामान्यांनाही आपले कुणीतरी आहे याचा प्रत्येय येत आहे या स्तुत्य उपक्रमाबद्दल गोंदिया चे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे आणि तालुका प्रशासनाचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share