Gondia: 23 गावात पाणी टंचाई उपाययोजना कामांना मान्यता

गोंदिया 10 : जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील-14, आमगाव तालुका-6 व देवरी तालुक्यातील-3, अशा एकूण 23 गावातील सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व विहिर खोलीकरण इनवेल बोअर करणे. तसेच सडक अर्जुनी तालुक्यातील-19, अर्जुनी मोरगाव तालुका-10, गोरेगाव तालुका-5, गोंदिया तालुका-17, तिरोडा तालुका-25, देवरी तालुका-23 व सालेकसा तालुक्यातील-4, अशा एकूण 103 गावात नविन विंधन विहिरी तयारी करण्याच्या कामांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन प्रशासकीय मान्यता दिली आहे.

     गोंदिया तालुक्यातील चंगेरा, वडेगाव, कोचेवाही, मरारटोला (कोचेवाही), सतोना, तांडा, अदासी, सेजगाव, एकोडी, दतोरा, माकडी, मुरपार, घिवारी, बिरसी (कॅम्प). आमगाव तालुक्यातील टाकरी, कवडी, पाउलदौना, सावंगी, पिपरटोला, अंजोरा. देवरी तालुक्यातील शिरपूर, गडेगाव, वांढरा अशा एकूण 23 ठिकाणी 15 लक्ष 09 हजार 697 रुपयांमधून सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व विहिर खोलीकरण इनवेल बोअर करण्यात येणार आहे.

नविन विंधन विहिरी तयार करण्यासाठी सडक अर्जुनी तालुक्यातील श्रीरामनगर येथे धनीराम ब्राम्हणकर यांचे घराजवळ, बोपाबोडी येथे वातुजी गोबळे यांचे घराजवळ, कोसमतोंडी येथे शारदा मंडप जवळ, मुरपार-ले येथे ग्रामपंचायत जवळ, धानोरी येथे चैतराम पटले यांचे घराजवळ, नैनपुरटोली/घटेगाव येथे निलेश पारधी यांचे घराजवळ, सलंगटोला (गिरोला) येथे दुधराम जांभुळकर यांचे घराजवळ, घाटबोरी/तेली येथे तिर्थनंद वंजारी यांचे घराजवळ, बौध्दनगर येथे परिहार बडोले यांचे घराजवळ, घोटी येथे सुभाष मेंढे यांचे घराजवळ, सावरटोली (रेंगेपार/पा.) येथे हेमराज मुंगमोडे यांचे घराजवळ, घाटबोरी/को. येथे पतीराम बाळबुध्दे यांचे शेतीजवळ, तिडका येथे भिमराव थुलकर यांचे घराजवळ, कोयलारी येथे बौध्द विहार जवळ, खडकी येथे राजीराम सलामे यांचे घराजवळ, पुतळी येथे रामदास नेवारे यांचे घराजवळ, उशीखेडा येथे सविता उके यांचे घराजवळ, नवोटोला/रेंगेपार/द येथे बापुराव उईके यांचे घराजवळ, पांढरवाणी/रै येथे भैय्यालाल मेश्राम यांचे घराजवळ.

      अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा येथे ग्रामपंचायत जवळ, सिलेझरी येथे प्रमोद गणवीर यांचे घराजवळ, घुसोबाटोला (सिलेझरी) येथे मिताराम वाघाडे यांचे घराजवळ, निमगाव येथे उध्दव खोब्रागडे यांचे घराजवळ, ताडगाव येथे देवाजी सयाम यांचे घराजवळ, तिडका/क. येथे ग्रामपंचायत जवळ, बोळदे/क. येथे सुरेश लंजे यांचे घराजवळ, कनेरी येथे श्यामराव कापगते यांचे घराजवळ, ढिवरमोहल्ला (गोठणगाव) येथे मधुकर मेश्राम यांचे घराजवळ, केशोरी येथे सदाशिव पंधरे यांचे घराजवळ.

गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथे मोहन टेकाम यांचे घराजवळ, हिरापूर येथे संजय नंदेश्वर यांचे घराजवळ, आसलपाणी येथे बिरसा मुंडा पुतळ्याजवळ, मुंडीपार येथे बाजार चौकात ग्रामपंचायत संकुल जवळ, बसटोली (भडंगा) येथे धनराज कवास यांचे घराजवळ.

गोंदिया तालुक्यातील फुलचूर येथे सुभद्रा नेवारे यांचे घराजवळ, फोनटोली (रतनारा) येथै भैय्यालाल दसरे यांचे घराजवळ, धापेवाडा येथे लोकचंद सोलंकी यांचे घराजवळ, इंदिरानगर (पिंडकेपार) येथे वसंत कोठेवार यांचे घराजवळ, गुलाबटोला (मजितपूर) येथे अशोक सोनवाने यांचे घराजवळ, मुरपार येथे वंदना गणीवर यांचे घराजवळ, संजयनगर (पिंडकेपार) येथे विजय प्रधान यांचे घराजवळ, इंदिरानगर (पिंडकेपार) येथे वसंत कोठेवार यांचे घराजवळ, गुलाबटोला (मजितपूर) येथे अशोक सोनवाने यांचे घराजवळ, मुंडीपार/ढा. येथे संजय कठाणे यांचे घराजवळ, डोंगरगाव येथे निखील इसराम यांचे घराजवळ, तांडा येथे हिरालाल मेश्राम यांचे घराजवळ, गोंडीटोला (आसोली) येथे किरण मसराम यांचे घराजवळ, घिवारी येथे रामचंद्र मेश्राम यांचे घराजवळ, गर्रा/बु. येथे पाण्याच्या टाकीजवळ, हड्डटोली (सतोना) येथे फुलीचंद जामरे यांचे घराजवळ, कारंजा येथे हेरबाजी वार्ड अंगणवाड क्र.1 जवळ.

       तिरोडा तालुक्यातील निमगाव येथे हिदराव बिसेन यांचे घराजवळ, लेंडीटोला (इंदोरा) येथे दुर्योधन कोशरकर यांचे घराजवळ, इंदिराटोली (खमारी) येथे सर्यलाल सुर्यवंशी यांचे घराजवळ, खैरबोडी येथे किरण बागडे यांचे घराजवळ, उदईटोला (गुमाधावडा) येथे राजेश शेंडे यांचे घराजवळ, इंदिरानगर (काचेवानी) येथे संतोष नेवारे यांचे घराजवळ, पिपरीया येथे चंगा पटले यांचे घराजवळ, सावरा येथे हनुमान मंदिर जवळ, इंदोरा/बु. येथे किल्या मुंग्या देवस्थान जवळ, करटी/बु. येथे हरी बघेले यांचे घराजवळ, डब्बोटोला येथे जमील शेख यांचे घराजवळ, बोरा येथे घनश्याम बिसेन यांचे घराजवळ, सेजगाव येथे राजेश गोडे यांचे घराजवळ, भिवसेनटोली येथे ग्रामपंचायत कॅटल शेड जवळ, बिरसी येथे दुर्योधन मारबदे यांचे घराजवळ, रामाटोली (सिल्ली) येथे मेजराम ठाकरे यांचे घराजवळ, मुरमाडीटोला (मुरमाडी) येथे हिरलाल पटले यांचे घराजवळ, चिखली येथे छगन हरिणखेडे यांचे घराजवळ, निलागोंदी (सर्रा) येथे गोविंद वैकुंठी यांचे घराजवळ, अर्जुनी येथे शिवाजी पटले यांचे घराजवळ, खोडगाव (बोपेसर) येथे शालीकराम नंदरधने यांचे घराजवळ, चुरडी येथे वासुदेव वाघमारे यांचे घराजवळ, वाल्मिकीटोली (करटी/खु.) येथे नंदू कावळे यांचे घराजवळ, मांडवी येथे राजेंद्र दमाहे यांचे घराजवळ, पांजरा येथे डोमाजी उके यांचे घराजवळ.

     देवरी तालुक्यातील वांढरा येथे ग्रामपंचायत कोंडवाड्याच्या समोर, मुरमाडी येथे पंचराम सिरसाट यांचे घराजवळ, नवाटोला (मेहताखेडा) येथे अंताराम नेताम यांचे घराजवळ, बेलारगोंदीटोली (शेडेपार) येथे सुरेश कुंजाम यांचे घराजवळ, केशोरी येथे मुकूंदा धमगाये यांचे घराजवळ, नवाटोला (भर्रेगाव) येथे सोमनाथ मडकाम यांचे घराजवळ, शिपुरबांध (मकरधोकडा) येथे सुगंधाबाई मरसकोल्हे यांचे घराजवळ, शिरपूरबांध (मकरधोकडा) येथे रेखलाल पंधरे यांचे घराजवळ, शिरपूरबांध (मकरधोकडा) येथे मनोज तुरकर यांचे घराजवळ, शिरपुरबांध (मकरधोकडा) येथे रामेश्वर आचले यांचे घराजवळ, शेडेपार येथे हेमंत कोचे यांचे घराजवळ, पुजारीटोला (कन्हाळगाव) येथे चंद्रभान बडोले यांचे घराजवळ, मुरदोली येथे सुखदास भोंडेकर यांचे घराजवळ, सलीयाटोला/रामनगर (फुक्कीमेटा) येथे साहेबराव मडावी यांचे घराजवळ, सुरतोली येथे अंगणवाडी समोर, ढिवरटोली (सुरतोली) येथे यशवंत भोयर यांचे घराजवळ, सावली येथे सुखराम इडवले यांचे घराजवळ, मुल्ला येथे समाज मंदिर जवळ, बेलगाव येथे रामसिंग उईके यांचे घराजवळ, पिपरखारी/सुंदरी येथे समाज मंदिर जवळ, ईस्तारी येथे दुर्गा जनबंधू यांचे घराजवळ, गोवारीटोला (उचेपूर) येथे शंभुलाल मुलेटी यांचे घराजवळ, रेहाडी (वांढरा) येथे शिवलाल मडावी यांचे घराजवळ.

     सालेकसा तालुक्यातील गांधीटोला येथे अवंतराम शेंडे यांचे घराजवळ, कारुटोला येथे ग्रामपंचायत समोर, मुंडीपार येथे हेमराज मोहारे यांचे घराजवळ, पोवारीटोला येथे लालबहादूर शहारे यांचे घराजवळ. अशा एकूण 103 ठिकाणी 1 कोटी 19 लक्ष 17 हजार 322 रुपयांमधून नविन विंधन विहीरी तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 23 ठिकाणी 15 लक्ष 09 हजार 697 रुपयांमधून सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व विहिर खोलीकरण इनवेल बोअर करणे आणि 103 ठिकाणी 1 कोटी 19 लक्ष 17 हजार 322 रुपयांमधून नविन विंधन विहिरी तयार करणे. अशा एकूण 126 ठिकाणी 1 कोटी 34 लक्ष 27 हजार 19 रुपयांमधून कामे करण्यात येणार आहे.

Share