Good News: आता घरबसल्या मिळवा ‘लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स’

मुंबई – राज्यात लर्निंग लायनन्सच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आता नागरिकांना घरबसल्या लर्निंग लायनन्स मिळविता येणार आहे. नुकतेच राज्य सरकारने 50 विभागिय वाहतूक कार्यालयांसाठी दोन आदेश जारी केले आहेत. यामध्ये घरबसल्या आधार कार्डच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. टेस्टसुद्दा ऑनलाइन घेतली जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्राचे वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितली आहे.

राज्य सरकारने 50 विभागिय वाहतूक कार्यालयांसाठी आदेश जारी केले आहेत. लर्निंग लायनन्ससाठी आता नाकराकांना आता घरबसल्या आधार कार्डच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. तसेच याची टेस्टसुद्दा ऑनलाइन घेतली जाणार आहे. आधार कार्डवरून व्यक्तीची ओळख पटवण्यात येईल आणि घरबसल्या लर्निंग लायसन मिळेल. दुसऱ्या आदेशात डीलर्सना आता नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांच्या नोदणीसाठी आरटीओ कार्यालयात येण्याची गरज नाही. तेसुद्धा आधार व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून शक्य आहे.

या सुविधा सुरु झाल्यानंतर आरटीओमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. यामुळे भ्रष्टाचार आणि एजंटच्या माध्यमातून लायसन्स देण्याचे कामही बंद होईल. लोकांचा वेळ आणि पैसे दोन्ही गोष्टी वाचतील. लायसन्स रिन्यू करण्यासाठी, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसह 18 कामांसाठी आता आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून होईळ. या वर्षी मार्चापासूनच या सुविधांसाठी आधारचा वापर केला जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक ते दोन दिवसांमध्ये माहिती देतील. असे महाराष्ट्राचे वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.

नव्या सिस्टिमनुसार टेस्टमध्ये तुम्हाला रोड सेफ्टी संदर्भात काही व्हिडिओ दिसतील. यानंतर तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागेल. ज्यामध्ये 60 टक्के गुण मिळवल्यास लायसन दिले जाईल. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्सस तयार करण्यासाठी आणि रिन्यूबाबत नविन गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार लर्नर लायसन्स मिळवण्याची सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन होईल. अर्ज करण्यापासून ते लायसन्सच्या प्रिंटिंगपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. यासोबत इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंटसचा वापर होणार आहे. यातून मेडिकल सर्टिफिकेट, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स, रिन्यूअल यांसाठी वापर होईल.

दरम्यान, नव्या गाडीच्या रजिस्ट्रेशनची नोंदणी प्रक्रियासुद्धा सुलभ करता येईल. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा रिन्यूअल आता 60 दिवस आधीच करता येणार आहे. याशिवाय टेम्पररी रजिस्ट्रेशनचा कालावधीसुद्दा एक महिन्यावरून 6 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share