अवैध सुगंधित तंबाखु विक्रेत्यांची माजी नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी


तालुका प्रतिनिधी / भद्रावती :
येथील चंडिका वार्डातील अवैध सुगंधित तंबाखु विक्रेत्यांच्या घरी भद्रावती पोलिसांनी टाकलेल्या धाडिचा राग म्हणात धरून येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक शेख सत्तार शेख रसुल यांना त्यांचा घरात घुसुन लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार नुकताच घडला.
३ जुन रोजी येथील चंडिका वार्डात भद्रावती पोलिसांनी साजिद शकिल शेख याच्या घरी धाड टाकून १ लाख ५० हजाराचा सुगंधित तंबाखु जप्त केला. तसेच साजिद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शेख सत्तार यांनीच पोलिसांना माहिती देऊन धाड टाकायला लावली असा गैरसमज करून घेवून साजिद शेख याने आपल्या सोबत तिन साथीदारांना घेवून शेख सत्तार यांच्या घरात घुसुन त्यांना अश्लील भाषेत शिविगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून पेट्रोल ओतून जाळून टाकण्याची धमकी दिली. या बाबत शेख सत्तार यांनी आपण पोलिसांना माहिती दिली नाही. असे सांगितले असता पोलिसांनीच तु माहिती दिल्याचे सांगितले असे म्हणून जर आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली तर तुला जीवानिशी ठार मारू अशी धमकी शेख सत्तार यांना देण्यात आली.


याबाबत दुसर्या दिवशी शेख सत्तार हे भद्रावती पोलस स्टेशन ला तक्रार देण्याकरिता गेले असता. मोठे साहेब हजर नाही तुम्ही आता घरी जा आम्ही उद्या येतो आणि त्यांना समजावितो असे म्हणून पोलिसांनी शेख सत्तार यांचा बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तसेच मारहाण करणारे लोक हे गुंडप्रव्रृतीचे असल्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या धमकीमुळे शेख सत्तार हे खुप घाबरलेले आहेत. या संदर्भात शेख सत्तार यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना ५ जून रोजी एक निवेदन सादर करून साजिद शकिल शेख, शकिल वदुद शेख, शाकिर शकिल शेख आणि लतिफ वदुद शेख यांच्या वर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Share