विजेच्या लपंडावामुळे देवरावांशी त्रस्त
?एकाच दिवशी शेकडो वेळा वीज पुरवठा खंडित
? इलेक्ट्रॉनिक साहित्याची मोठी नुकसान होण्याची शक्यता
देवरी 8: नुकताच पहिल्या पावसाचा तालुक्यात आगमन झाला असून विजेचा लपंडाव मोठ्याप्रमाणात सुरु झाला आहे. त्यामुळे देवरीवाशी त्रस्त झाल्याचे बघावयास मिळत आहे.
विशेष म्हणजे पहिल्या पावसात साप , विंचू असे विषारी सरपटणारे प्राणी रस्त्यावर धाव घेतात त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वीजवितरण कंपनीच्या अनियोजित कामामुळे ही स्थिती निर्माण झाली असून जनसामान्याला आज असह्य त्रास होत आहे असे प्रश्न नागरिक करीत आहेत.
देवरी हे तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा विजेच्या लपंडावाची समस्या बघावयास मिळत असून ग्रामीण भागातील स्थिती याहून बिकट असेल ही शक्यता नाकारता येत नाही. महावितरण ने याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्यानी केली आहे.