आदिवासी सेवा सह.संस्था सावली (देवरी) येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उदघाटन खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते संपन्न

देवरी 7: तालुक्यातील सावली येथे जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आदिवासी सेवा सह.धान खरेदी केंद्राचे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते संपन्न. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी धानाची विक्री करण्यास कोणतीही अडचण होवू नये तसेच व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावा लागु नये यासाठी श्री पटेल शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास प्रयत्नशील होते. रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरु करण्यासाठी श्री पटेल हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते याकरिता राज्याच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन धान खरेदी करीता येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यात आला. तसेच रब्बी हंगामातील धान खरेदी करिता शासकीय इमारती अधिग्रहित करण्यासाठी श्री पटेल यांच्या पाठपुराव्यानंतर सरकारी शाळांमध्ये धान साठवणुकीची व्यवस्था करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून जिल्ह्यातील सरकारी शाळा उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामातील धान खरेदीकरिता असलेली समस्या मार्गी लागली आहे.यावेळी खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, सौ.दुर्गा तिराले, गोपाल तिराले, झुलनबाई पंधरे, श्यामलाल उईके,देवनाथ बिंझलेकर, उर्मिला परतेकी,चंद्रसेन रहांगडाले,सुभाष रहाते, मर्चंड सराटे, होलुजी मरस्कोल्हे , रतिराम भेलावे, चांगुणा टेकाम,अंतकलाबाई परतेती, रेणुकाबाई उईके, सिरवंता परतेती. राजेश्वरी बिनझालेकर, निर्मला मेंढे,नाजूका गौतम, निर्मला शिवणकर, कैलास भेलावे, पुस्पराज पंधरे, संतोष कुसमारे, प्रवीण सोनटक्के,प्रभुदयाल पवार, चैतराम धुर्वे, चंद्रसेन राहांगडले, संजय मेहर, रामेश्वर पवार, संजय बिनझलेकर, कैलास गुरव, विजय उईके सहित पदाधिकारी उपस्थित होते.

Share