शेतकऱ्यांच्या अडचणी आपण सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू -खा. प्रफुल पटेल

देवरी 7: तालुक्यातील कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक सिताराम लान देवरी येथे खासदार मा.श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थीतीत पार पडली. याप्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी व नागरिकांसोबत विविध समस्यावर चर्चा केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू. शेतकऱ्यांचा मालाच्या भावाचा प्रश्न किव्हा बोनसचा प्रश्नन असो आपण प्रामाणिक पणे सोडविले आहे. आणि आणखी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत, तसेच वरिष्ठ पदाधिकार्यानी जनतेचे कामे सोडविण्यासाठी प्रामाणिक पणे काम करावे, पक्ष संघटन मजबूत करून, येणाऱ्या काळातील निवडणुका आपण नक्की जिंकू असा विश्वास त्यांही कार्यकर्त्यांना संबोधून व्यक्त केला. परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी फोन वर चर्चा करून समस्या निकाली काढण्याचे निर्देश श्री पटेल यांनी दिले.

या बैठकी दरम्यान श्री पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, सौ.दुर्गा तिराले, रमेश ताराम, सी. के. बिसेन, गोपाल तिराले, सौ.सुमनताई बिसेन,सौ.अर्चना ताराम, सौ.पर्बताताई चांदेवार, अन्य कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share