11 दुकानदारांवर जिल्हाधिकारी संदीप कदम यांची कारवाई
यावेळी तब्बल 11 दुकानावर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी स्वत: कारवाई केली. यावेळी 11 हजार 300 रुपयाचा दंड ही नगर परिषदद्वारे वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या अचानक भेटीने अनेक दुकानादारांची यावेळी धड़की भरली आहे. राज्य सरकारने पहिल्या फ्रेजमध्ये 18 जिल्हाला अनलॉक केले आहे. त्यात भंडारा जिल्हाचा देखील समावेश केला आहे. लेवल तीनमध्ये असलेल्या भंडारा जिल्हाला काही अंशी अनलॉक करण्यात आले आहे. यावेळी अनलॉकच्या स्थितिची संपूर्ण जबाबदारी राज्यसरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे त्यांची तपासणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तेव्हा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.