निखिल बन्सोड ठरला MVLA संस्थेच्या युवा पुरस्काराचा मानकरी

देवरी 7: मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या (MVLA ) वतीने दरवर्षी शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, कृषि सेवा, साहित्य, कला, क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रात देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल अवार्डचा माणकरी देवरी तालुक्यातील मुंडिपार येथील निखिल तुकेश्वर बन्सोड हा ठरला आहे.

सदर पुरस्काराचे वितरण मुंबई येथे 20 ऑगस्ट 2021 ला आयोजित कार्यक्रमात त्याला सन्मानीत करण्यात येणार आहे. निखिल हा “द स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन पुरस्कृत” भारतीय विद्यार्थी संघटनेचा गोंदिया जिल्हा अध्यक्ष पदावर तसेच संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देवरी या पदावर कार्यरत आहे. युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही २०१९ विधान भवन मुंबई येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अवघ्या वयाच्या १९ व्या वर्षी महाराष्ट्र विरोधी पक्षनेते म्हणून गोंदिया जिल्ह्यचे प्रतिनिधित्व केले होते हे विशेष.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या गुणिजन गौरव महापरिषद पुरस्कार २०२१ निवड समितीने निखिल च्या कार्याची , समाज प्रबोधन समाज जनजागृती प्रती आपली असलेली तळमळ याची दखल घेत ‘राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाज रत्न पुरस्कार २०२१’
पुरस्कार मानकरी म्हणूनअंतिम यादी” (FINAL LIST) मध्ये निवड करण्यात आलेली आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी रजि. ट्रस्ट आयोजित गुणिजन गौरव महापरिषदेमध्ये 25 गटा पैकी 20 व्या क्रमांकाचा गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Share