कोरोना काळात शेतक-यासह इतर लोकांचे शोषण होऊ नये- आ. कोरोटे

देवरी/सालेकसा ०७: देशासह राज्यात कोरोना महामारीमुळे सर्वाची आर्थिक परस्थिती ढासळलेली आहे. अशी परिस्थिती असतांनाही राज्याची महा विकास आघाडी सरकारने शेतकरी व सर्व लोकाची काळजी घेणे गरजेचे आहे.यात शेतकर्‍यांना मदत,सहकार्य पिकाला योग्य दर धानाचे बोनस त्वरीत मिळावा या करीता शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे.याविषयी शेतकर्‍यांनी काळजी घेऊ नये, हा माझा संकल्प आहे की शेतकरी बांधवांसह गोर गरीब लोकानां भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण शासन व प्रशासन लवकरच करणार आहे. यात शेतक-यांसह इतर लोकाचे शोषण होणार नाही असे प्रतीपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

सविस्तर असे की,आमदार सहषराम कोरोटे यांनी आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत येणा-या देवरी तालुक्यातील आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या अंभोरा, चिचगड, चिंचेवाडा, पुराडा व सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथील असे एकूण पाच धान खरेदी केन्द्राचे उद्घाटन केले. या प्रसंगीआदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दूधनाग, माजी आमदार संजय पुराम, तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप भाटिया, महासचीव बळीराम कोटवार,महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री मुलेवार,प्रकल्प अधिकारी वसंत राहेलवार, श्री सयामसर यांच्या सह सर्व केन्द्रातील अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचीव व संचालक मंडळी प्रामुख्याने उपस्थीत होते.यावेळी निरीक्षक प्रेमलाल पिहदे, अंभोरा संस्थेचे उपाध्यक्ष शिवकुमार राऊत, चिचगड सहकारी संस्थेचे अध्यक्ष संत रामजी भोयर, भुवजी नरवरे किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष जीवन सलामेजी, संदीप कटकवार चिचेवाडा संस्थेचे अध्यक्ष भाउरावजी लट्ये, देवेंद्रजी गेडाम, पुराडाचे अध्यक्ष माणिक बापू वाचले, गणेश भेलावे, बिजापूर संस्थाचे अध्यक्ष रमण लाल आत्राम, दिलीपजी वाघमारे माजी उपाध्यक्ष, राजू काळे, मेहतर वटी, इतर अधिकारी व कॉंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Share