कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम: सुधारित धान बियाणे वाटप

“देवरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धानपिकाचे बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. तालुक्यातील देवरी व चिचगड मंडळातील 133 गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे अशी माहिती देवरीचे तालुका कृषि अधिकारी जि.जी.तोडसाम यांनी दिली.”

देवरी 7: तालुका हा अतिशय अवर्षण प्रवण कोरडवाहू असुन बहुतांस धानाची शेती हि पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तालुक्यात मागील दोन हंगामात उत्पादनामध्ये सरस ठरलेले वाण को-५१, एमटीयु १०१०, एमटीयु १००१ आहेत. सदर जातींची उत्पादकता ४२०० किलो हेक्टर उच्चांकी आलेले आहे. धानाच्या या जाती लोकप्रिय झालेले आहेत. कारण या जाती निमगरव्या प्रकारात मोडत असुन ११० ते १२० दिवसाच्या आत पक्व होवून अधिक उत्पादन देतात. तालुक्यातील जमिनीची प्रत व पावसाचे प्रमाण लक्षात घेता कमी कालावधीच्या जातींची शिफारस करण्यात येत आहे.

खबरदार..! किंमती वाढवून रासायनिक खते विकाल तर..

कृषि विभागाने चालू वर्षी को-११ (२३ क्वि.), एमटीयु-१०१० (१२० क्वि.), एमटीयु१००१ (३० क्वि.), सुवर्णा (७.५० क्वि.), श्रीराम ४ क्वि., तूर- पिके पिकेव्ही-तारा फुले-१२ (४ क्वि.) या पिकाच्या तालुक्यासाठी एकुण-२०० क्वि., बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले आहे. धान को-५१ या प्रमाणित वाणासाठी ५०% अनुदान देण्यात आले असून इतर जातीच्या बियाणासाठी २६% अनुदान देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वरील बियाणे उपलब्ध करण्यासाठी मंडळ कृषि अधिकारी, देवरी व चिचगड कार्यालयातून आनलाईन, आफलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांना परमिट उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यानी संबंधित कृषि सहाय्यका मार्फत मंडळ कृषि अधिकारी कार्यालय, देवरी येथे संपर्क साधावा. बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध केल्याने शेतकऱ्याचा प्रतिसाद मिळत आहे.

देवरी तालुक्यातील धान शेतीमधील कमी उत्पादकतेची कारणमिमांशा शोधून त्यावर उपाय योजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. चिचगडचे मंडळ कृषि अधिकारी श्री. चंद्रकांत कोळी यांनी धानावर येणाऱ्या तपकिरी हिरवे तुइटुडे व खोडकीडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतीशाळाच्या माध्यमातून प्रतीबंधानात्मक उपायांची प्रचार प्रशिद्धी सुरु केलेली आहे. तपकिरी तुडतुद्यांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकर्यांनी धानाची लागवड पट्टा पद्धतीने करावी असे आआव्हाहनकेले आहे. तसेच धानपिकामध्ये खोडकिडी सारख्या पतंगवर्गीय किडीचे प्रादुर्भाव होवू नये म्हणून नर्सरी पासूनच संपूर्ण कालावधीतीत अमावश्या दरम्यान शेतात प्रकाश सापळा‌ लावण्यात यावे, असे आव्हाहन केले आहे.

Share