शिवसैनिकांनी आगामी नगरपंचायत, जि.प. व पं.स. निवडणूकीसाठी सज्ज व्हावे
?शिवसेनेचे गोंदिया-भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाड यांचे आवाहन
?देवरी येथे आगामी निवडणूक विषयी सभेचे आयोजन
?सभेतुन शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यता अभियानाला सुरुवात.
डॉ. सुजित टेटे/ संपादक
देवरी, ता.०३: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचने नुसार गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हा नारा देत आजपासून देवरी तालुक्यात शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यता अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाला यशस्वी रित्या पूर्ण करीत जास्तित जास्त लोकांना शिवसेनेत समावून घ्यावे आणि देवरी शहरातील नगरपंचायतच्या १७ जागा व जिल्हा परिषद चे ५ जागा आणि पंचायत समिति चे १० जागेवर शिवसेना पूर्ण ताकदी निशि निवडणूक लढुन यात यश सम्पादन करण्यासाठी तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन शिवसेनेचे गोंदिया-भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख नीलेश धुमाड यांनी केले.
ते देवरी येथील जि.प. च्या विश्रामगृहात सोमवारी (ता.०२ नोव्हेंबर ) रोजी आयोजित आगामी निवडणूक विषयी सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते. या सभेतुन शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यता अभियानाला ही सुरुवात करण्यात आली.
ही सभा शिवसेनेचे गोंदिया- भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख नीलेश धुमाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि गोंदिया जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. या सभेत देवरी नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिति च्या निवडणूक विषयी सविस्तर चर्चा करुण सभेत निलेश धुमाड, सुरेंद्र नायडू व तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शिवसेनेचे देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, शहरप्रमुख राजा भाटिया, शिक्षक सेनेचे तालुका प्रमुख अनिल कुर्वे, शहरप्रमुख सुभाष दुबे, वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण मेश्राम, तालुका प्रमुख गगन भाटिया, शहर समन्वयक परवेझ पठान, उपशहर प्रमुख रौनक भाटिया, महेश फुन्ने, विधानसभा संघटक राजीक खान, उपतालुका प्रमुख डाकचंद मडावी, सुहाग गिरी, युवा सेना तालुका प्रमुख दिलीप बघेल, शहरप्रमुख देवराज जगने, वार्ड प्रमुख राजा मिश्रा, छन्नू नेवारगड़े, विभाग प्रमुख प्रशांत यादव, शिवसैनिक काशीराम उइके यांच्या सह तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते.
या सभेचे प्रास्तावीक तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी तर संचालन युवा सेनेचे शहर प्रमुख देवराज जगने यांनी आणि उपस्थितांचे आभार शहरप्रमुख राजा भाटिया यांनी मानले.