ओबीसी समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार
प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी देवरी तहसीलदारांना दिले निवेदन
जिल्हा सचिव राजेश चांदेवार यांच्या सह ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित
देवरी, ३: राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी सेवा संघ , ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ, प्रणित ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया यांच्याद्वारे ओबीसी समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार.
ओबीसी समाजाच्या संविधानिक न्याय, मागण्या व समस्या पूर्ण करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध मंत्र्यांना देवरीचे तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. सदर निवेदनामध्ये दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबई येथे ओबीसी गोलमेज परिषदेचे आयोजन तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डिसेंबरला विधानभवनावर महामोर्चा काढून विधानभवनात घेराव करण्याचे नमूद करण्यात आलेले आहे. सदर निवेदनामध्ये ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या व समस्या खालील प्रमाणे आहेत.
१. ओबीसी समाज ओबीसी समाजाची 2021 मध्ये होऊ घातलेली जातिनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात जातिनिहाय जनगणना करून ओबीसी समाजात न्याय मिळवून द्यावा.
२. मराठा समाजात द्यावयाच्या आरक्षणात ओबीसी समाजाचा विरोध नाही परंतु ओबीसी समाजात मिळत असलेल्या 19 टक्के आरक्षणातून देण्यात येऊ नये ही ओबीसी समाजाची आग्रहाची मागणी आहे.
३. ओबीसी समाजात चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नंदुरबार धुळे ठाणे नाशिक पालघर या जिल्ह्यातील आरक्षण 19% करण्यात यावे
४. शंभर टक्के बिंदू नियमावली केंद्र सरकारच्या 2-4 -97 व 3-1- 1919 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्वरित सुधारित करण्यात यावी
५.महाराष्ट्र राज्यात प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा 2019 त्वरित लागू करण्यात यावा
६. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे.
७.महा ज्योती व संस्थेत करिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद लवकर सुरू करण्यात यावे
८. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना त्वरित सुरू करण्यात यावे
अशा एकूण वीस मागन्या सदर निवेदनातून करण्यात आलेल्या असून उपलब्ध सर्व मागण्या राज्य व केंद्र सरकार लक्ष केंद्रित करण्याकरिता दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदारामार्फत राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उपयुक्त मान्यवरांना निवेदन पाठवण्यात आले.
यावेळी देवरी तहसीलदारांना निवेदन देतेवेळी ओबीसी कृती समितीचे सचिव राजेश चांदेवार, ओबीसी संघर्ष कृती देवरी तालुका अध्यक्ष कृष्णा ब्राह्मणकर, ओबीसी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, अरुण सावरकर, संतोष बहेकार, डॉ. सुजित टेटे यांच्यासह ओबीसी कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.