Maharashtra अनलॉकचे पाच टप्पे निश्चित; सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : दोन दिवसांपुर्वी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील 18 जिल्हे शुक्रवारपासून पूर्णपणे उघडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हे सर्व प्रकरण चांगलंच पेटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या अधिकृत जनसंपर्क कार्यालयाकडून अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध महाराष्ट्रात काढण्यात आलेले नाहीत तसेच आणि अनलाॅक संदर्भात निर्णय झाला नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती अखेर खरी ठरली आहे.

राज्यातील स्तरनिहाय अनलॉक बाबतचा आदेश अखेर जारी करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री हा आदेश देण्यात जारी करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता या दोन आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.

असे असतील पाच टप्पे –

पहिला स्तर- कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के आणि 25 टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड असलेल्या जिल्ह्यात हा स्तर असेल, यात भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार असून मॉल, थीएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुद्धा नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत.

दुसरा स्तर- कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के आणि 25 ते 40 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेडस भरले आहेत असलेल्या जिल्ह्यासाठी हा स्तर असेल, या जिल्ह्यात सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. मॉल, थीएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.

तिसरा स्तर- कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्के किंवा 40 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, असलेल्या जिल्ह्यासाठी हा स्तर असेल, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू आहेत तर वीकेंडला बंद राहणार आहे.

चौथा स्तर- कोरोना पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड 60 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत. यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहतील.

पाचवा स्तर-पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा अधिक किंवा 75 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापले आहेत असे जिल्हे आहेत. यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील तर वीकेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील.

Share