धक्कादायक! विज पडून महिलेचा मृत्यू तर 1 गंभीर

?दुःखाचे डोंगर शेतकऱ्यांच्या नशिबी

प्रहार टाईम्स

देवरी 4: मान्सूनचे आगमनाला सुरुवात झाली असून काल पासून तालुक्यात पावसाला आणि विज वादळाला सुरुवात झाली असून आज देवरी तालुक्यातील चारभाटा गावात दुर्दैवी घटना घडली .

प्राप्त माहितीनुसार आज सायंकाळी 5 वाजता विजेच्या कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली त्यामध्ये शेतात काम करत असतांना वज्रघाताने राधिका रामुजि शाहारे (वय ५३ ) या महिलेचा मुत्यु झाला असून मुलगी दुर्गा रामुजी शाहारे गंभीर जखमी असून देवरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share