नक्षल व आदिवासी गोंदिया जिल्हात धान खरेदी सुरु करण्यासाठी झटले आजी माजी आमदार

?आदिवासी बहुल आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात थाटात केला धान खरेदीचा केंद्राचा उद्दघाटन

?माजी आमदार संजय पुराम आणि आमदार सहषराम कोरोटे यांच्या प्रयत्नाला यश

प्राचार्य डॉ.सुजित टेटे

देवरी 04: गोंदिया जिल्हातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त बहुल भाग म्हणून आमगाव , देवरी , सालेकसा तालुक्याची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी व नक्षल भागात समस्याचे कधीच समाधान होत नाही हे सर्वांना परिचयाचे आहे. या भागातील आदिवासी लोकांचे शेती हेच पारंपारिक व्यवसाय असून शेतीवरच यांचे प्रपंच चालत असते. या भागात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून सर्वांचे कुटुंब शेती व्यवसायावर अवलंबून आहे. येथील शेतकरी हंगामी आणि रब्बी उत्पादन घेत असून त्यांना त्यांच्या धानाला हमी भाव तसेच बोनस मिळावा यासाठी चिंतेत असतो . यावेळी राज्य शासनाने जिथे गोडाऊन आहे तिथेच धान खरेदी करा असे शासन निर्णय काढल्यामुळे आदिवासी धान खरेदी केंद्रावर कुठेही धानाला साठविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे रब्बी चे धान कुठे साठवून खरेदी करायचे असे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे क्षेत्रातील माजी आमदार संजय पुराम आणि विद्यमान आमदार सहषराम कोरोटे यांच्या प्रयत्नांने विधानसभा क्षेत्रातील आश्रम शाळेत तात्पुरती धान खरेदी आणि गोडाउन ची सोय झाल्यामुळे धान खरेदी ला ग्रीन सिग्नल मिळाले आहे.

जनतेच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी आमदार संजय पुराम आणि विद्यमान आमदार सहषराम कोरोटे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे क्षेत्रातीलशेतकऱ्याना आशेची किरण मिळाली असून क्षेत्रातील पुराडा , चिचगड , अंभोरा , बीजेपार येथील आश्रम शाळेत धान खरेदीला सुरुवात झालेली आहे.या धान खरेदी केंद्राच्या उद्दघाटनाच्या वेळी पुराडा , चिचगड , अंभोरा व बीजेपार येथील शेतकरी , आदिवासी विकास संस्थेचे अधिकारी कर्मचारी आणि संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी आदिवासी विभाग महामंडळाचे अधिकारी आणि आश्रम शाळा उपलब्ध करून दिली म्हणून देवरी चे प्रकल्प अधिकारी यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

Share