आमदार कोरोटे यांच्या १ कोटी निधितून पाणी टंचाई ग्रस्त गावात नवीन बोरवेल खोदकामाला शुभारंभ
देवरी ०२ : आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यातील एकूण ८३ गावातील लोकांचे पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता आमदार सहषराम कोरोटे यांनी आपल्या स्थानिक आमदार निधितून १ कोटी रुपये पानी टंचाई ग्रस्त ८३ गावाकरिता नवीन बोरवेल खोदकामासाठी दिले. या गावात बोरवेल खोदकामाला शुभारंभ झाले असून सदर काम युद्ध स्तरावर सुरु आहे. त्यामुळे आता सदर ८३ गावात पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याने या गावातील लोकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरन निर्माण झाले आहे. असी माहिती देवरी तालुका काँग्रेसाध्यक्ष संदीप भाटिया यांनी प्रसिद्धि पत्रकातुन दिली आहे.
प्रसिद्धि पत्रकात तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांनी म्हटले आहे आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यातील एकूण ८३ गावात दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असते. त्यामुळे येथील लोकांना पाण्याकरिता खुप पायपिट करावी लागत होती. ही बाब लक्षात घेता आमदार सहषराम कोरोटे यांनी पुढाकार घेवून आपल्या स्थानिक आमदार निधितून १ कोटी रूपयाचे नवीन बोरवेल मंजूर करुण या बोरवेल खोदकामास शुभारंभ ही करण्यात आले असून मंजूर नवीन बोरवेल खोदकामाचे काम युद्ध स्तरावर सुरु आहे. आता या ८३ गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भाषणार नाही.
आमदार कोरोटे यांच्या स्थानिक आमदार निधितून मंजूर झालेले नवीन बोरवेल मध्ये देवरी तालुका- फुटाना, परसोड़ी, पिंडकेपार, निलज, चिचगड, कोसबी, पिपरखारी , मासुलकसा, मल्हारबोडी, पळसगाव, सुकळी, हेरपार, चंदीटोला, गडेगाव, कथलीटोला, मेहताखेड़ा, रेहळीफाटा, कडीकसा, गुजरबड़गा, मिसपीरी, महाका, ढूबरूटोला, चिपोटा, चिल्हाटी, ककोडी व धोबीटोला आणि आमगांव तालुका- पदमपुर-२ ठिकाणी, आमगांव-२ ठिकाणी, रिसामा-२ ठिकाणी, सरकारटोला-२ठिकाणी, बोदा-२ ठिकाणी, गिरोला-२ठिकाणी, माल्ही, बिर्सी, गोरठा, बोधली, घाटटेमनी, टाकरी, भोसा, कालीमाटी, टेकरी, मरारटोला, कट्टीपार, गोंडीटोला, बुरारीटोला, करंजी, चिरचाळबांध, बंजारीटोला, कार्तुली, जवरी, मरारटोला व किकरीपार व सालेकसा तालुका- महाराजीटोला, कावराबांध, सलंगटोला, झालिया, मुरुमटोला, पानगांव, कुणबीटोला, भर्रोटोला, महारीटोला, सोनपुरी, झालिया, टोयागोंदी, रोडा, पोपारीटोला, साखरीटोला, जमाकुडो, दल्लाटोला, पठानटोला, पिपरीया, सोनपुरी, ,शिकारीटोला या गावाचा समावेश असून आमदार कोरोटे यांच्या पुढाकाराने या गावात नवीन बोरवेल मंजूर करुण खोदकामास सुरुवात झाले आहे. त्यामुळे येथील लोकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती देवरी तालुका अध्यक्ष संदीप भाटिया यांनी प्रसिद्धि पत्राकातुन दिली आहे.