दुपारच्या झटपट बातम्या

महाराष्ट्रात कोरोना उपचार स्वस्त!

राज्यात शहरांची A, B आणि C अशी वर्गवारी करून दर निश्चित! रुग्णाला दाखल करून घेतानाच द्यावे लागेल प्रोव्हिजनल बिल; अधिसूचनेस मंजुरी, काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.


औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आत्मदहनाचा प्रयत्न!

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ, फुलंब्री तालुक्यातील घटना, शेकडो मोर्चे काढूनही मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

त्या तरुणाने 5 मे रोजी फेसबुक लाइव्हद्वारे तसेच निवेदन देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा पाच मराठा तरुण पाच सार्वजनिक ठिकाणी आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला होता.

गोवा बनावटीची 72 लाखांची दारु जप्त

गोवा बनावटीची दारु अनधिकृतपणे गोव्याहून मध्य प्रदेशकडे वाहतूक करणाऱ्या चौघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 72 लाखांची दारु बांदा इन्सुली येथे जप्त करण्यात आली आहे. या अवैध दारु वाहतूक प्रकरणी मध्य प्रदेशच्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 8 लाखांच्या ट्रकसह तब्बल 72 लाखांची दारु असा एकूण 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

आता एकनाथ खडसे यांनी घेतली शरद पवारांची भेट!

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. अशातच फडणवीस यांच्या पाठोपाठ राषट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली.

मान्सून 10 जूनपर्यंत राज्य व्यापणार

महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 99% पाऊस; जून-जुलैमध्ये पावसात मोठे खंड, यंदा मान्सून गुजरातच्या दिशेने येणे शक्यता, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस; महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज

मेहुल चोकसीसाठी भारताचे 8 सदस्यांचे पथक

चोकसी सध्या डॉमिनिकची राजधानी रोसोतील एका रुग्णालयात, पीएनबी कर्ज घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोकसीला परत आणण्यासाठी (मिशन चोकसी) भारताचे आठ सदस्यीय पथक डॉमिनिकला रवाना

उत्तर प्रदेशात भीषण सिलिंडर स्फोट

सिलिंडर स्फोटामुळे घराचं छत कोसळलं, 7 ठार तर 6 गंभीर जखमी, सात मृतांत तीन चिमुकल्यांचाही समावेश; जखमींना लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आलं.

जाणून घ्या देशातील आजची कोरोना स्थिती (2 जून 2021 रोजी दु. 12.27 वाजता)

▪️एकूण सक्रिय रुग्ण : 17,89,138
▪️एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,61,71,976
▪️ कोरोनामुळे आतापर्यंत एकूण मृत्यू : 3,35,121
▪️ देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 21,85,46,667

वाघांचा रस्ता अडवल्या प्रकरणी 4 जणांना नोटीस

चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प मार्गावर वाघांचा रस्ता अडवल्या प्रकरणी वनविभागाने 4 जणांना नोटीस बजावली आहे. मोहर्ली-पद्मापूर मार्गावर सोमवारी काही दुचाकीस्वारांनी दोन वाघांचा रस्ता अडवून मोबाईलने चित्रीकरण केलं होतं. वाघांचं हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कारवाईची झाली होती मागणी

Share