साताऱ्यात 8 वर्षीय मुलीला चालत्या ट्रेनमधून दिलं फेकून, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
सातारा : राज्यात हत्या, बलात्कार यांचे प्रमाण जास्तच वाढत चालले आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या घटना घडत असल्याचे कानावर पडत असते. अशातच सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. एका 8 वर्षीय मुलीला चालत्या ट्रेनमधून फेकून दिलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हा सगळा प्रकार साताऱ्यातील लोणंद ते वाठार स्टेशनच्या दरम्यान घडला आहे. तसेच हा सगळा प्रकार रात्री साधारण 1 वाजताच्या सुमारास घडला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अतिप्रसंग करताना 8 वर्षीय मुलीने आरडा-ओरडा केला म्हणून तिला चक्क ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं. सकाळी जखमी अवस्थेत काही ग्रामस्थांना मुलगी सापडली. त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
या सगळ्याची माहिती तातडीने काही माणसांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या मुलीचा जबाब घेतला. त्यानूसार गोवा निझामुद्दीन एक्सप्रेस साताऱ्यातील या गाडीतून एक कुटुंब प्रवास करत होतं. आपल्या तीन मुलींसह पती पत्नी दिल्लीला जात होते. रात्री जेवण झाल्यानंतर सगळे झोपलेले असताना. त्यातील 8 वर्षीय मुलीला आरोपीने बाथरूममध्ये नेलं. त्या मुलीला जाग येताच तिने आरडा-ओरडा करायला सुरूवात केली. त्यावेळी तिला आरडा-ओरडा करू नकोस तुला आई-वडिलांकडे नेतो. असं म्हणत तिला बाथरूमच्या बाहेर आणलं आणि ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं.
ट्रेनमध्ये धक्कादायक प्रकार घडला असल्यानं पोलिसांनी लगेच तपासाला सुरूवात केली. पिडीत मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी अवघ्या 10 तासांमध्ये आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला भुसावळमध्ये अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.