गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या- अजित पवार

मुंबई: तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला 1000 कोटींची मदत जाहीर केली होेती. यावरून महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालं. त्यामुळे गुजरातला मदत केल्यावर महाराष्ट्राला मदत करावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली गेली. मात्र अद्यापही केंद्राने कोणतीही मदत जाहीर केली नाही. यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

एमएमआरडीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रामदास आठवले आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी बोलताना,  राज्याची कोणती कामं असतील काही मागण्या असतील तर सांगा मी त्या केंद्रापर्यंत पोहोचवून कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करतो, असं रामदास आठवले. याचाच धागा पकडत अजित पवारांनी मोदींना टोला हाणला.

रामदास आठवले मला आणि मुख्यमंत्र्यांना म्हणाले की केंद्राकडून काही मदत हवी असल्यास कळवा. माझी रामदास आठवलेंना एवढीच विनंती आहे की तुम्ही केंद्रात आहात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवण करुन द्या तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा मोदींनी केवळ गुजरातचा दौरा केला आणि तातडीनं 1 हजार कोटींची मदत जाहीर केली पण महाराष्ट्रात ते का आले नाहीत? हे अद्याप काही कळालेलं नाही, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, . गुजरातला 1 हजार कोटी दिलेत. महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या, असा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असंही अजित पवार यांनी म्हटलं. यावेळी बोलताना पवारांनी पेट्रेलच्या वाढत्या किमतींवरूनही केंद्रावर निशाणा साधला.

Share