दिलासादायक ! कोरोना उपचारासाठी ‘या’ बॅंका देणार 5 लाखांचे वैयक्तिक कर्ज, जाणून घ्या

प्रहार टाईम्स : देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला उपचारासाठी पैशाची मोठी गरज असते. एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न अनेकांना पडत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी बँका(Bank) तुम्हाला उपचारासाठी 5 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन देत आहेत. SBI आणि इंडियन बँक(Bank) असोसिएशनने एका संयुक्तीक पत्रकार परिषदेत या योजनेची घोषणा केली आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी दिले जाणारे पर्सनल लोन हे माफक व्याजदरात दिले जाणार आहे. तसेच ही य़ोजना व्यापकपणे राबविण्यासाठी नियम आणि अटी देखील सरकारी बँकांनी ठरविल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोना उपचारासाठी पैशांची गरज असल्यास असुरक्षित वैयक्तिक कर्ज देणार आहेत. यात 25 हजारांपासून 5 लाखांपर्यंत हे अर्थ सहाय्य सॅलरीड, नॉन सॅलरीड आणि पेन्शनधारकांना दिले जाणार आहे. यावेळी बँकांनी आपण ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी देखील हेल्थकेअर बिझनेस लोन पुरवत असल्याचे स्पष्ट केले. अर्थ मंत्रालयाने नुकतेच हॉस्पिटलना 2 कोटींपर्यंतचे कर्ज 7.5 टक्क्यांच्या व्याजदराने दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. ECLGS 4.0 नुसार हे कर्ज दिले जाणार आहे. यात नर्सिंग होम, ऑक्सिजन प्लँटसाठी 100 टक्के गॅरंटीसह हे कर्ज दिले जाणार आहे. याचसोबत हेल्थकेअर फॅसिलिटीसाठी 100 कोटींपर्यंतचे कर्ज कंपन्यांना त्यांच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी दिले जाणार आहे.

Share