वनमजुराचा मृतदेह जंगलात आढळल्याने परिसरात खळबळ

प्रहार टाईम्स /देवरी:31 देवरी वनविभागात वनमजूर पदावर कार्यरत योगेश विठ्ठल शेन्डें (५४) याचा मृतदेह कार्यरत असलेल्या राजनडोगंरी क्षेत्रातील परिसरात आढळून आले आहे.

प्राप्त माहिती नुसार मृत योगेश विठ्ठल शेन्डें (५४ ) रा. देवरी काल पासून घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली आणि सदर माहिती वनविभाग आणि पोलीस ठाणे देवरी येथे दिली.

शोधाशोध केल्यानंतर मृतकाचे मृतदेह कार्यरत असलेल्या वनपरिसरात आढळून आले असून मृतदेहाजवळ विषाचे बॉटल आणि दारूचे बॉटल आढळून आले असल्याचे प्रत्येक्षदर्शिनी सांगतले. या घटनेचा तपास देवरी पोलीस करीत असून मृत्यूच कारण काय ते लवकरच कळेल.

Print Friendly, PDF & Email
Share