गौण खनिजाची रॉयल्टी असतांनाही तहसीलदारांची चुकीची कार्यवाही- अनिल येरणे

?पत्रकाद्वारे माध्यमांना दिले स्पष्टीकरण

प्रहार टाईम्स / देवरी 30: तालुक्यात अवैद्य गौण खनिज प्रकरण चांगलेच गाजत असून सदर प्रकरणाच्या चर्चा जिल्हात रंगल्या आहेत. अवैद्य गौण खनिज आढळून आल्या प्रकरणी देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी मागील आठवड्यापासून धडक मोहीम राबवून अवैद्य गौण खनिज बाळगणाऱ्यावर कार्यवाही केली. अशीच कार्यवाही दि. 26/05/2021 ला देवरी येथील विविध ठिकाणी करून संबंधितांवर 27/05/2021 ला दंड आणि चौकशीचे आदेश दिले. यामध्ये देवरीचे प्रतिष्ठित तसेच भाजपा तालुका अध्यक्ष अनिल येरणे आणि त्यांचे वडील झामसिंग येरणे यांचे नाव होते. त्यावर अनिल येरणे यांनी आज माध्यमांना पत्रकाद्वारे आपले स्पष्टीकरण दिले असून आपली बाजू मांडली.

काय म्हणाले अनिल येरणे ? वाचा त्यांचा आरोप

“दि. 26/05/2021 रोजी बुध्द पौर्णिमेची शासकिय सुट्टी असतांना सुध्दा देवरी चे तहसिलदार विजय बोरुडे यांनी माझ्या गोंडवाना वे ब्रिज परीसरात व शिवाजी कॅम्पस परीसरात भेट देवून तिथे पडून असलेले गौण खनिज बोल्डर व रेती ही अवैध असल्याचे सिध्द न करता सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडून माझ्या व माझे वडील झामसिंगजी येरणे यांच्या विरुध्द अनुक्रमे ३० ब्रास रेती व १० ब्रास बोल्डर अवैध असल्याची खोटी कार्यवाही केली. यावेळी आम्हाला आपली बाजू मांडण्याची व रॉयल्टी दाखविण्याची कोणतीही मुभा न देता चुकीची व बोगस कार्यवाही केलेली आहे.

अधिक वाचा –

दि. 26 मे रोजी नोटीस काढून ती आम्हाला दि.28मे 2021 ला दंड आदेशासोबतच बजावून खोटे आदेश पारीत केले आहे. शासकिय सुट्टी 26 मे ला असतांना तहसिलदार देवरी यांनी कार्यालय सुरु कसे केले ? दि. 26 मे 2021 ला पत्रकारांना व्हाट्सअप व्दारे दंड केल्याचे आदेश कसे का प्राप्त झाले ?

तहसिलदार देवरी यांनी अशा अनेक बोगस कार्यवाहया करुन वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत वाहवाही मिळवीण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कार्यवाही करीत असतांना योग्य ती चौकशी न करता व केलेली कार्यवाही कायदेशिर आहे की, नाही याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

मी व माझे वडील आम्ही दोघेही एक प्रतिष्ठीत नागरीक असून या बोगस कार्यवाहीमुळे तहसिलदारांनी आमची प्रतिमा मल्लीन करण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. मी व माझ्या वडीलांच्या नावांनी बोल्डर व रेतीचा गौण खनीजचा शासनमान्य (परवाना) रॉयल्टी असतांना सुध्दा आम्हाला आमची बाजू मांडण्याची एकही संधी तहसिलदार यांनी दिली नाही व एकाच दिवशी जो सुट्टीचा दिवस आहे. त्याच दिवशी चुकीची कार्यवाही केलेली आहे. अशा चुकीच्या कार्यवाहीसाठी तहसिलदरांना वरीष्ठांचा आशिर्वाद तर प्राप्त नाही ना ? असा संदेह निर्माण होतो आहे. तहसिलदार देवरी यांनी मला व माझे वडील झामसिंगजी येरणे यांच्या विरोधात जी बोगस दंडात्मक केलेली आहे, याचे विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे” असे आपले स्पष्टीकरण पत्रकाद्वारे माध्यमाने दिले.

काय होते प्रकरण ? वाचा सविस्तर

?92 लक्ष 65 हजार 800 रुपये दंड आणि चौकशी ची झाली होती कारवाही-

देवरीतील अवैध गौणखनिज तस्करांवर तब्बल 92 लाख 65 हजार 800 रु.दंड

या प्रकरणाबद्दल काय म्हणाले देवरी चे तहसीलदार विजय बोरुडे वाचा ?

“मी केलेली कार्यवाही ही नियमानुसार असून एका घटनास्थळी अनिल येरणे हे उपस्थित होते. मी त्यांना रॉयल्टी,(परवाना) सादर करण्याकरिता बराच वेळ दिला होता, परंतु त्यांनी रॉयल्टी सादर केली नाही. करीता मी केलेली कारवाही ही नियमानुसार केली आहे. तालुका दंडाधिकारी असल्यामुळे सुट्टीच्या दिवशीही कार्यवाही करता येते.”

विजय बोरुडे(तहसीलदार देवरी)
कार्यवाही चे आदेश -1
कार्यवाही चे आदेश-2
Print Friendly, PDF & Email
Share