गोंदिया जिल्ह्यात 65 रुग्णांची कोरोनावर मात, देवरी तालुका ग्रीन झोन च्या मार्गावर
3 मृत्यूसह जिल्ह्यात नवे 75 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
गोंदिया 30: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून
आज 30 मे रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 75 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर 65 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आजपर्यंत 40665 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 39603 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 374 आहे. 205 क्रियाशील असलेले बाधित रुग्णघरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 688 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.61 टक्के आहे तर डब्लिंग रेट 83 दिवस आहे.
कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी केले आहे.