कोविड-19 प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणार्‍या 13 दुकानदारांवर गुन्हे दाखल

तिरोडा 30: राज्यशासन आणि जिल्हाधिकारी यांच्या ‘ब्रेक दि चेन’ या आदेशान्वये सकाळी 11 वाजतापर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून दिवसभर दुकाने सुरू ठेवणार्‍या दुकानदारांविरुद्ध 28 व 29 मे रोजी तिरोडा पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. त्या अंतर्गत एकूण 13 दुकानदारांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 188, 269, सहकलम 51 (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 20058 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल झालेल्या दुकानदारांची नावे 

  1. अंकित अशोक असाटी रा. काचेवानी 
  2. मनोहर राघोबा कटरे रा. काचेवानी 
  3. गौरीशंकर सहादेव राणे रा. काचेवानी 
  4. जीअलदास खिलोमन खियानी रा. सिंधी कॉलनी, तिरोडा 
  5. सचिन सुलीचंद सोनेवाने रा. चुरडी 
  6. नीलेश भीमराव राऊत रा. चुरडी 
  7. किरण प्रीतीचंद बंसोड रा. काचेवानी 
  8. योगेश छबिलाल कटरे रा. बेलाटी 
  9. हेमराज बंसिराज शेंडे रा. सुकडी-डाकराम 
  10. ताऊचंद जयपाल शेंडे रा. सुकडी-डाकराम 
  11. जितेंद्र सहादेव बोपचे रा. बोरगाव 
  12. अशोक भास्कर मेश्राम रा. करटी 
  13. धर्मपाल तुळशीराम बागडे रा. करटी 

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोलीस हवालदार दामले, पोलीस नायक थेर, बरवैय्या, बर्वे, रक्षे, सव्वालाखे, बांते, पोलीस शिपाई रामटेके, सपाटे, लोंढे यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share