करीना कपूर खान शिकवणार कोरोना रुग्णांचे कपडे कसे धुवायचे? किंवा कुठली काळजी घ्यायची?

कोरोनामुळं देशवासीयांवर मोठं संकट कोसळलं आहे. (Coronavirus) लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेकजण आपापल्या परीनं संकटात अडकलेल्या नागरिकांना मदत करत आहेत. या मदत कार्यात आता अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिनं देखील भाग घेतला आहे. ती कोरोना रुग्णांचे कपडे कसे धुवायचे? किंवा कुठली काळजी घ्यायची? याबाबत महत्वाची माहिती आपल्या चाहत्यांना देत आहे. (How to wash clothes)

“कोरोनाबाधित रुग्णांचा टॉवेल, चादर स्वतंत्र धुवावी आणि हे कपडे हाताळताना जाड हॅण्डग्लोव्ज घालावेत. 60 ते 90 अंश तापमानात डिटर्जंटने हे कपडे धुवावेत किंवा कपडे गरम पाण्यात भिजवून ठेवावेत, यावेळी एखाद्या काठीचा वापर करावा. हे करताना पाणी उडू नये याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करणे टाळावा. त्याच्या कपड्यांचं पाणी गळणार नाही याची काळजी घ्यावी. किवा दुसऱ्या एखाद्या वेगळ्या भांड्यात ठेवावेत. कपडे धुताना जर गरम पाणी नसेल तर क्लोरिन टाकून अर्धा तास कपडे भिजत ठेवल्यानंतर ते स्वच्छ पाण्यात कपडे घुसळून उन्हात वाळवा. शेवटी सर्व काम झाल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवा” अशी माहिती दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share